MS Dhoni, Virat Kohli & Rohit Sharma On Twitter Blue Tick : टीम इंडियाचे माजी कर्णधार एमएस धोनी, विराट कोहली यांच्यासह विद्यमान कर्णधार रोहित शर्मासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची ट्विटर ब्लू टिक काढण्यात आली आहे. ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल, असे जाहीर केलेय. म्हणजे, ब्लू टिक हवे असल्यास सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. याआधी प्रसिद्ध व्यक्तींना मोफत ब्लू टिक मिळत होती. पण इलॉन मस्क यांनी ट्वीटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर नियमात बदल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्री विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ब्लू टिक काढण्यात आले. ट्वीटर सीईओच्या मते, यापुढे ब्लू टिक हवे असल्यास पैसे मोजावे लागतील.  


हार्दिक पांड्याच्या खात्याचे ब्लू टिक कायम - 


प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्वीटर खात्यासमोरील ब्लू टिक काढण्यात आले आहे. पण भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याच्या खात्यापुढील ब्लू टिक कायम आहे. हार्दिक पांड्याने ट्वीटर ब्लू टिकचे सब्सक्रिप्शन घेतले आहे. त्यामुळेच पांड्याच्या खात्यासमोरील ब्लू टिक कायम आहे. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्ट्सने दिलेलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटर करूण नायर याच्या ट्वीटर खात्यासमोर 20 एप्रिल रोजी रात्री ब्लू टिक होती. पण त्यानंतर ती काढण्यात आले.  करूण नायर याच्याशी याबाबत विचारणा केली. तो म्हणाला की, ब्लू टिकसाठी पैसे देण्याची इच्छा नाही. ब्लू टिक असली आणि नसली तरी काही फरक पडत नाही. 


विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा यासारखे दिग्गज पैसे भरणार का ?


ट्विटर ब्लू टिकसाठी प्रति महिना 8 डॉलर रुपये भरावे लागणार आहेत. तर बिजनेस कंपनीसाठी एक हजार डॉलर प्रति महिना रक्कम ठेवण्यात आली आहे. विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मासह दिग्गज क्रिकेटर ब्लू टिकसाठी पैसे मोजणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.  अष्टपैलू हार्दिक पांड्या यावे मासिक शुल्क भरत ब्लू टिक घेतली आहे. 


ब्लू टिक पेड सर्विस म्हणजे काय?


यातील बदल म्हणजे ब्लू टिक पेड सर्विस अर्थात सशुल्क सेवा. ज्यांना ब्लू टिक आहे त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.


आता ब्लू टिक कसे मिळवायचे? 


जर एखाद्या युझरला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.