Shreyas Iyer : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्या दुखापतीसंदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे. लंडनमध्ये श्रेयस अय्यर याच्या कमरेची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. सर्जरी झाल्यानंतर श्रेयस अय्यर याला पुन्हा मैदानावर येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये अय्यर खेळताना दिसणार नाही. भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून श्रेयस अय्यर याने मध्यक्रमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडली होती. पण पाठदुखीमुळे अय्यर टीम इंडियाबाहेर गेला. त्यानंतर आयपीएलच्या सोळाव्या हंगामातूनही त्याला माघार घ्यावी लागली.
अय्यर मागील काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करत होता. बॉर्डर गावस्कर मालिकेत अय्यर टीम इंडियातून खएळला.. पण त्याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले. त्यानंतर अखेरच्या कसोटी सामन्याला अय़्यर मुकला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या एखा रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी श्रेयस अय़य्र याची सर्जरी यशस्वी झाली आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळू शकते. त्यानंतर तो भारतात परतणार आहे. अय्यर याला काही महिने आराम करावा लागेल, त्यानंतरच तो मैदानावर परतेल.
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकणार आहे. त्याशिवाय ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे याआधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. हे तिन्ही खेळाडूंची रिप्लेसमेंट मिळणं कठीण आहे, त्यामुळे हा टीम इंडियाला मोठा झटका आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत होणार आहे. जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर मालिकेत पराभवूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळवली होती. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधीच टीम इंडियाच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत.
दुखापतीमुळे आधी जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतही आणखी सहा ते सात महिने मैदानावर परतणार नाही. या दोन धक्क्यातून टीम इंडिया सावरत नाही, तोपर्यंत श्रेयस अय्यरचा मोठा झटका बसला आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियामध्ये नाही. तर ऋषभ पंत याचा डिसेंबर मध्ये अपघात झाला होता. तो थोडक्यात बचावला. पण पुढील सहा ते सात महिने तो क्रिकेट खेळू शकत नाही. त्यातच आता अय्यरच्या दुखापतीने चिंता वाढवली आहे. आता आयपीएलमध्ये आणखी एखाद्या खेळाडूला दुखापत झाली नाही, म्हणजे मिळवले. कारण, आता दुखापतीमुळे टीम बाहेर गेलेल्या खेळाडूंची रिप्लेसमेंट मिळणे कठीण आहे.