MS Dhoni in IPL 2023 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023) काही महिन्यांत पार पडणार आहे. आता 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL 2023 Auction) सर्व संघ आपल्या रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. धोनी यंदाही चेन्नई सुपरकिंग्स अर्थात सीएसके (CSK) संघाचं कर्णधारपद भूषवणार असून यंदाची आयपीएल त्याची अखेरची आयपीएल असू शकते. कारण 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर आयपीएल 2020 पासून धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होणार अशा चर्चा होत्या. पण धोनीने मात्र या चर्चांवर कायम पूर्णविराम लावला होता. पण यंदा मात्र तो निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे.  


याचं कारण धोनीने याआधी बोलताना त्याला आयीपीएलचा अखेरचा सामना चेन्नईमध्येच खेळायचा आहे, अशी इच्छा वर्तवली होती. पण आयपीएलचे मागील काही सीजन कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यासारखे होत नव्हते. आधी युएईमध्ये सामने झाल्यावर आयपीएल 2022 चे सामने महाराष्ट्रात झाले होते. फायनल गुजरातमध्ये झाली होती. पण यंदा आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. त्यामुळे धोनीला चेन्नईमध्ये सामना खेळायला मिळणार असून यामुळे तो यंदा निवृत्ती घेऊ शकतो. 


भारतीय संघासोबत धोनी जोडला जाणार?


आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भारतीय संघासोबत काम करेल असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. बीसीसीआयला धोनीच्या अनुभवाचा उपयोग भारताचा टी-20 संघ मजबूत करण्यासाठी करायचा आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक अर्थात मेन्टॉर बनवण्यात आलं होते. मात्र, यावेळी त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. धोनीला ठराविक खेळाडूंसोबत काम करण्यास सांगितले जाऊ शकते जेणेकरून संघ टी-20 मध्ये भारत आणखी ताकदवर होईल.


कोचीमध्ये होणार मिनी लिलाव 


पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आयपीएलचा 16 व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.


हे देखील वाचा-