IPL 2023 Auction : आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती समोर येत असून बरेच दिग्गज यंदा स्पर्धेला मुकणार असल्याचं समोर येत आहे. आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची असून त्यामध्ये रिटेन केलेले आणि रिलीज केलेले खेळाडू सांगायचे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सह बऱ्याच संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी तयार केली आहे. 


या दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आयपीएल 2023 चा भाग असणार नाहीत, असं समोर येत आहे. पॅट कमिन्स हा कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. मिचेल स्टार्क आयपीएल मेगा लिलाव 2022 चा भाग नव्हता, त्यामुळे तो सध्या कोणत्याही संघाचा भाग नाही. याशिवाय गुजरात टायटन्सने मॅथ्यू वेडला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान तो खेळणार की नाही याबद्दल नेमकी माहिती समोर आलेली नाही. तसंच मुंबई इंडियन्सने केरॉन पोलार्डला सोडले आहे. पोलार्ड आयपीएल 2010 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. त्याने संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. दरम्यान पोलार्ड आता निवृत्त झाल्यामुळे आता तो आयपीएलही खेळणार नाही असं समोर येत आहे. तसंच इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सने ट्वीट करत तो आयपीएल 2023 मध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. बिलिंग्सच्या म्हणण्यानुसार, त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे तो आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार नाही.


आयपीएलचा 16 वा हंगाम अर्थात आयपीएल 2023 साठी आता काही महिने शिल्लक असून या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे. दरम्यान यंदा हा हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा परदेशात किंवा ठरावीक शहरांत पार पडत होती.


हे देखील वाचा-