IPL :आयपीएल म्हणजे चौकार, षटकारांचा पाऊस. त्यात अखेरच्या षटकांमध्येतर फलंदाजाच फॉर्म पाहून क्रिकेटरसिकांचं कमाल मनोरंजन होत असतं. तर अशाप्रकारे अखेरच्या षटकात मनोरंजन करण्यात सर्वात अव्वल स्थानी असणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने 20 व्या षटकात सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकले असून या यादीत टॉप 5 मध्ये 4 फलंदाज भारतीय आहेत.


यात अव्वल स्थानावर असणाऱ्या धोनीने 20 व्या षटकात 99 वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला आहे. यात त्याने 51 षटकार आणि 48 चौकार लगावले आहेत. तर धोनीनंतर पोलार्डचा नंबर लागतो. पोलार्डने 33 षटकार आणि 26 चौकार ठोकत 59 वेळा चेंडू सीमारेषेबाहेर केला आहे. तिसऱ्या स्थानावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा असून त्याने 23 षटकार आणि 18 चौकार ठोकले आहेत. यादीत चौथ्या स्थानावर हार्दिक पंड्या असून त्याने 16 चौकार 24 षटकार लगावले आहेत. यादीत पाचव्या स्थानावर चेन्नईचा रवींद्र जाडेजा असून त्याने 13 चौकार आणि 25 षटकार लगावले आहेत.


पुन्हा दिसला व्हिंटेज धोनी


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings Vs Mumbai Indians) आमने-सामने आले. या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईवर तीन विकेटस् राखून विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं  (MS Dhoni) मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकातील चार चेंडूत चेन्नईला विजयासाठी 16 धावांची गरज असताना महेंद्रसिंह धोनीनं मुंबईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईच्या संघाला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र, या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रिटोरियस बाद झाला. त्यानंतर चेन्नईला सामना जिंकून देण्याची संपूर्ण जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली. चेन्नईला विजयासाठी चार चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर धोनीनं पहिला षटकार मारला, मग चौकार, त्यानंतर दोन धावा काढून त्यानं स्ट्राईक स्वत:जवळ ठेवली. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना धोनीनं चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-