IPL 2022 : क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज म्हटलं तर विराट कोहली हे सारेच जाणतात. पण मागील काही काळापासून विराट त्याच्या फॉर्ममध्ये नसल्याचं प्रकर्षाने दिसून येत आहे. पण विराट त्याच्या खराब फॉर्ममध्येही अनेक खेळाडूंपेक्षा सरस खेळत असल्याचंही अनेकजण म्हणतात. दरम्यान विराटचा सर्वात क्लासिक शॉट म्हणजे कव्हर ड्राईव्ह जगभरात प्रसिद्ध आहे. पण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मागील काही काळात दमदार खेळीच्या जोरावर विराटच्या क्लासिक कव्हर ड्राईव्हला टक्कर देणारा कव्हर ड्राईव्ह लगावण्यास सुरुवात केली आहे. 


विराटचा कव्हर ड्राईव्ह बेस्ट की बाबर आझमचा या चर्चेला कायम सोशल मीडियावर विविध क्रिकेट शोमध्ये उधान येत असतं. अशामध्ये आता  आयपीएल  2022(IPL 2022) गाजवणाऱ्या जोस बटलरने (Jos Buttler) देखील त्याचं मत नोंदवलं आहे. त्याला विराटचा कव्हर ड्राईव्ह अधिक आवडत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना जोसने ही प्रतिक्रिया दिली आहे.  


'माझ्यासोबत सलामीला रोहित आल्यास मला आवडेल'


सध्याच्या क्रिकेटमध्ये जोसला सलामीला त्याच्यासोबत रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्यास अधिक आवडेल. रोहितसोबत सलामीला उतरण्याची बटलरची इच्छा असल्याचं देखील यावेळी बटलर म्हणाला आहे.  यावेळी सूर्यकुमार यादवबाबत (Suryakumar Yadav) देखील त्याने प्रतिक्रिया दिली. सूर्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात बेस्ट स्कूप शॉट खेळतो, असं तो म्हणाला.


जोस बटलरचं विक्रमी शतक



कोलकाताविरुद्ध जोस बटलरनं 59 चेंडूत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दुसरं शतक ठोकलं. ज्यात 9 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट 172.88 होता. यानंतर जोस बटलर आयपीएलमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतक ठोकणारा सहावा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेल, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन आणि संजू सॅमसन यांनी तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत. गेल- 6, विराट कोहली- 5, डेव्हिड वॉर्नर- 4, वॉटसन- 4 आणि संजू सॅमसननं 3 शतके केली आहेत. 


हे देखील वाचा-