IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल 2022 चा 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीच्या संघाकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला. ज्यामुळं त्याच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.
आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीचं खराब प्रदर्शन
आयपीएलचा पंधरावा हंगाम विराट कोहलीसाठी खराब ठरला आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं 12 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं केवळ 216 धावा केल्या आहेत. तर, यापैकी एकाच सामन्यात त्याला अर्धशतक करता आलं आहे. आज हैदराबादविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीनं शून्यावर विकेट गमावली. ज्यामुळं त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात विराट कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. तर, संपूर्ण आयपीएलमध्ये सहाव्यांदा तो गोल्डन डकचा शिकार ठरला आहे.
विराटची सुरेश रैनाच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी
आयपीएलमधील एकाच हंगामात चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना एकाच हंगामात तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. याशिवाय, कोलकाताचा आक्रमक फलंदाज नितीश राणानंही एका हंगामात तीन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे.
आयपीएलमधील एकाच हंगमात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू-
खेळाडूचं नाव | वर्ष | किती वेळा |
सुरेश रैना | 2013 | 3 |
रोहित शर्मा | 2018 | 3 |
नितीश राणा | 2020 | 3 |
विराट कोहली | 2022 | 3 |
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायजर्स हैदराबादला 67 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून हैदराबादसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाचा डाव 125 धावांवर आटोपला.
हे देखील वाचा-
- CSK vs DC: रवींद्र जाडेजा संघाबाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
- Team India Captaincy: 'माझ्याऐवजी धोनीला कर्णधार का बनवलं?' 'त्या' वादावर युवराज सिंह स्पष्टच बोलला
- IPL 2022 : आयपीएलसोडून राजस्थानचा मॅचविनर खेळाडू मायदेशी परतला, पाहा व्हिडीओ