Team India Captaincy:  माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh)  हा भारताच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. भारतानं जिंकलेल्या 2007 मधील टी-20 विश्वचषक आणि 2011 मधील एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंहनं महत्वाची भुमिका बजावली होती. त्यानं भारतीय संघात अनेकदा फिनिशरची भूमिका बजावली आहे. मात्र, तरीही तो कधी पूर्णवेळ भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकला नाही.  आता युवराजनं स्वतःला टीम इंडियाचा कर्णधार न बनवण्यामागचं कारण सांगितलं आहे. 


युवराज सिंह काय म्हणाला?
एका कार्यक्रमात संजय मांजरेकरांशी बोलताना युवराज सिंह म्हणाला की, मी भारताचा कर्णधार बनणारचं होतो, तेव्हाच ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर यांच्यात वाद झाला. या वादात माझ्या सहकारी खेळाडूला पाठिंबा देणारा मी माझ्या संघातील एकमेव खेळाडू होतो.बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना हे आवडलं नाही. त्यानंतर अचानक मला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं.  त्यावेळी वीरेंद्र सेहवाग संघासोबत नसल्यानं एमएस धोनीला टी-20 विश्वचषक 2007 मध्ये भारताचा कर्णधार सोपवण्यात आलं. 


त्यावेळी माझ्याकडचं भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवलं जाणार होतं...
वीरेंद्र सेहवाग सिनिअर होता. परंतु, तो इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यावेळी मी भारतीय संघाचा उप कर्णधार होतो. तर, राहुल द्रव्हिड कर्णधार होता. अशातच मलाच कर्णधार बनवलं जाणार होतं. परंतु, संघ व्यवस्थापननं असा निर्णय घेतला, जो माझ्याविरोधात होता. त्याची मला अजिबात खंत वाटत नाही. आजही असं काही घडलं तर मी माझ्या सहकारी खेळाडूंना पाठिंबा देईल, असंही युवराज सिंह म्हणाला. 


धोनीबाबत काय म्हणाला युवराज सिंह?
पुढे युवराज सिंह म्हणाला की, 'काही वेळानंतर मला वाटले की धोनी खरोखरच कर्णधार म्हणून खूप चांगली कामगिरी करत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा तो कदाचित सर्वोत्तम खेळाडू होता. त्यानंतर मला खूप दुखापत होऊ लागल्या. मला कर्णधार बनवले असते तरी मला ते सोडावं लागलं असतं. त्यामुळे जे घडते ते चांगल्यासाठीच होतं, असं म्हणता येईल. भारताचे कर्णधारपद न मिळाल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असं युवराज सिंह म्हणाला आहे.


हे देखील वाचा-