CSK vs DC, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 54 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीच्या संघाचं नेतृत्व भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत करत आहे. तर, महेंद्रसिंह धोनीकडं पुन्हा चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईनं विजय मिळवल्यास आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


आयपीएल 2022 मधील दोन्ही संघाची कामगिरी
यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 


हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 26 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 16 सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. आजच्या सामन्यात 


चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन: 
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर, कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षणा, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी.


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: 
डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकिपर, कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे.


हे देखील वाचा-