MIW vs UPW WPL 2023, Highlights : महिला प्रीमियर लीगमध्ये (Women's Premier League) मुंबई (MI) संघाची विजयाची मालिका सुरुच आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यूपी वॉरियर्सवर (UP Warriors) 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौर आणि सीवर ब्रंट यांच्या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकता आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेत 4 सामन्यांमध्ये सलग चौथा विजय आहे.


मुंबईचा यूपीवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय


वुमन्स प्रीमियर लीग (WPL) रविवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध यूपी वॉरियर्स (UP Warriors) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने यूपी वॉरियर्सचा आठ विकेट्सने पराभव केला. मुंबई संघाचा हा सलग चौथा विजय असून गुणतालिकेत मुंबई इंडियन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबई इंडियन्सच्या विजयात मोठं योगदान दिलं आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या, तर यूपी तिसऱ्या क्रमांकावर आहे.






मुंबई संघाची चांगली सुरुवात


यूपीने मुंबईला 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. यादरम्यान यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांच्यात पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 58 धावांची भागीदारी झाली. हेली मॅथ्यूजने 12 धावा केल्या, तर यास्तिका भाटियाने अवघ्या 27 चेंडूत सात चौकार आणि एका षटकारांसह 42 धावांची खेळी केली.


हरमनप्रीत कौरच्या नाबाद 53 धावा


महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससमोर यूपी वॉरियर्सचे आव्हान होतं, मात्र या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने अ‍ॅलिसा हिलीच्या संघाचा सहज पराभव केला. मुंबई इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी 160 धावांचं लक्ष्य होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने अवघ्या 17.3 षटकांत 3 गडी गमावून 164 धावा करुन सामना जिंकला. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या. तिने 9 चौकार आणि एक षटकार मारला.


सीवर ब्रंटची शानदार खेळी


नॅट सायव्हर-ब्रंटने 31 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 45 धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि नॅट सीवर ब्रंट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. सलामीवीर यस्तिका भाटियाने 27 चेंडूत 42 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने 8 चौकार आणि एक षटकार लगावला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सकडून गुजरात जायंट्सचा दारुण पराभव, 10 विकेट्सनी दिली मात