DCW vs GGW, WPL 2023 : शनिवारी म्हणजेच 11 मार्च रोजी महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) गुजरात जायंट्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे (Gujrat Giants vs Delhi capitals) आव्हान होते. या सामन्यात मेग लॅनिंगच्या दिल्ली संघाने स्नेह राणाच्या गुजरात संघाचा सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सला सामना जिंकण्यासाठी 106 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मेग लॅनिंगच्या संघाने अवघ्या 7.1 षटकांत बिनबाद 107 धावा करून सामना जिंकला. शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्ससाठी धडाकेबाज खेळी केली. शेफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. या युवा फलंदाजाने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले.


शेफाली वर्माची झटपट खेळी


शेफाली वर्माशिवाय कर्णधार मेग लॅनिंग 15 चेंडूत 21 धावा करून नाबाद माघारी परतली. तिने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा अवघ्या 7.1 षटकांत 10 गडी राखून पराभव केला. त्याआधी सामन्यात, गुजरात जायंट्सची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 105 धावाच करू शकला. गुजरात जायंट्ससाठी किम गर्थने 37 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. याशिवाय जॉर्जिया वेरहॅम आणि हरलीन देओल यांनी अनुक्रमे 22 आणि 20 धावांची खेळी केली.


मारिजन कॅपची घातक गोलंदाजी


दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं तर, मारिजेन कॅपने घातक गोलंदाजी केली. मारिजेन कॅपने 4 षटकांत 5 खेळाडूंना 15 धावा देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर शिखा पांडेला 3 विकेट्स घेण्यात यश मिळालं. शिखा पांडेने 4 षटकात 26 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय राधा यादवला 1 यश मिळालं. राधा यादवने 4 षटकात 19 धावा देत 1 बळी घेतला. दरम्यान, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा 4 सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध 8 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनी आतापर्यंत 4 पैकी केवळ एकच सामना गमावला आहे. आता रविवारी यूपी वॉरियर्सचा संघ पॉइंट टेबलवर कब्जा करणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर भिडताना दिसणार आहे.


WPL सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-