IPL Auction 2024 : दुबईमध्ये उद्या आयपीएलचा लिलाव होणार आहे. अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंवर लाखो रुपयांची बोली लागणार आहे. दुबईत होणाऱ्या लिलावात संघाच्या नजरा वेगवान गोलंदाजांवर असतील, त्यामुळे गोलंदाज मालामाल होऊ शकतात. पाच वेगवान गोलंदाजाबद्दल पाहूयात, ज्यांच्यावर सर्व संघाच्या नजरा असतील.


मिचेल स्टार्क


2015 पासून मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळला नाही. नुकताच झालेला विश्वचषकात मिचेल स्टार्कसाठी शानदार होता.  यंदाच्या लिलावात मिचेल स्टार्कचे नाव निश्चित मानले जातेय. डावखुऱ्या मिचेल स्टार्कवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 


गेराल्ड कोएत्जी


भारतात झालेल्या विश्वचषकात गेराल्ड कोएत्जी याने आफ्रिकेसाठी शानदार गोलंदाजी केली होती. त्याशिवाय अखेरच्या षकात फलंदाजीही करु शकतो. गेराल्डने 14 वनडे सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. लिलिवात सर्व संघाच्या नजरा आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्जी याच्याकडे असतील. 23 वर्षीय खेळाडूवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 
 
जोश हेजलवूड


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा आरसीबीचा सदस्य होता. त्याला रिलिज करण्यात आलेय. हेजलवूड लाईन अन् लेंथसाठी ओळखलं जातं. हेजलवूड लिलावात उतरणार असल्यामुळे सर्व संघाच्या नजरा त्याच्यावर असतील.  


लॉकी फर्ग्यूसन


कोलकाता नाइट रायडर्सने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला रिलिज केलेय. आयपीएलमध्ये लॉकी फर्गुसन याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. याआधी गुजरात आणि पुण्याच्या संघाचा सदस्य होता. वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्गुसनला ओळखले जातेय. त्याला घेण्यासाठी आयपीएल लिलावात चुरस पाहायला मिळेल. 


जोफ्रा आर्चर


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मुंबईने रिलीज केले होते. जोफ्रा आर्चर अखेरच्या षटकात यॉर्कर चेंडू टाकण्यात पटाईत आहे. लिलावात सर्वच संघाची नजर जोफ्रावर असेल. 


आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?


IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन 2023 च्या आयपीएलसाठी सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता या वेळी कोणत्या खेळाडूला सर्वात महागडी बोली लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


 लिलावात बोली लागणारे महत्वाचे खेळाडू - 


हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव