हैदराबाद : आयपीएल (IPL 2024)मध्ये काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आठवी मॅच पार पडली. मुंबई इंडियन्सला हैदराबाद विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या चांगलाच अंगलट आला. हैदराबादच्या फलदाजांनी मुंबईच्या बॉलिंगला फोडून काढलं. हैदराबादनं पहिल्या 11 ओव्हर्समध्ये 160 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. हैदराबादच्या फलदाजांच्या जोरदार फटकेबाजीमुळं अखेर हार्दिक पांड्याला रोहित शर्माची मदत घ्यावी लागली.
चार दिवसांमध्ये चित्र पालटलं
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिली मॅच 24 मार्चला पार पडली होती. या मॅचमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व पहिल्यांदा करत होता. पहिल्याच मॅचमध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला फिल्डींगला कुठं उभं राहायचं याबाबतच्या सूचना देत होता. हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला डीपला बाऊंड्रीवर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं हार्दिक पांड्या ट्रोल झाला होता. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये घडलेल्या प्रसंगाच्या बरोबर उलटं चित्र हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं.
अखेर हार्दिकनं घेतली रोहित शर्माची मदत
हार्दिक पांड्यानं हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केल्यानंतर हार्दिक पांड्याला अखेर रोहित शर्माची मदत घ्यावी लागली. रोहित शर्मानं हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मुंबईची फिल्डींग लावली. यावेळी रोहित शर्माच्या सूचनेप्रमाणं हार्दिक पांड्या डीप बाऊंड्रीवर फिल्डींगसाठी जाऊन उभा राहिला.
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि क्लासेनचं वादळ
हैदराबादच्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या बॉलिंगची धुलाई केली. ट्रेविस हेडनं 24 बॉलमध्ये 62 धावा केल्या. यामध्ये त्यानं 18 बॉलमध्ये 62 धावा केल्या. यानंतर लगेचच अभिषेक शर्मानं 16 बॉलमध्ये 50 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 63 धावा केल्या. यानंतर हेन्रिच क्लासेननं 80 धावा केल्या. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 277 धावा केल्या होत्या.
मुंबईचे प्रयत्न अपुरे पडले
सनरायजर्स हैदराबाद केलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना मुंबईनं देखील आक्रमक सुरुवात केली होती. रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर , तिलक वर्मा, टीम डेविड रोमारिओ शेफर्ड आणि हार्दिक पांड्या यांनी चौकार षटकरांची आतिषबाजी करत 277 धावांचं आव्हान पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईच्या संघाला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा तिलक वर्मानं केल्या. मुंबईला यंदाच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
संबंधित बातम्या :