Pat Cummins, IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी दारुण पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबादने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली. हैदाराबादला पहिल्या सामन्यात कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. आज हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी हरवलं. हैदराबादच्या विजयामध्ये कर्णधार पॅट कमिन्स याचा सिंहाचा वाटा होता. पॅट कमिन्स याने मोक्याच्या क्षणी जबाबदारी घेत विजयात मोलाचा वाटा उचलाला. 


चौकार षटकारांचा पाऊस पडत असताना पॅट कमिन्स याने भेदक मारा करत केलाच. त्याशिवाय कर्णधार म्हणून त्यानं योग्य ते प्लॅनिंग करत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बाद केले. इतकेच काय तर फिल्डिंग कराताना पॅट कमिन्स याने शानदार झेलही घेतला. धोकादायक ठरणाऱ्या नमन धीर याचा कमिन्सने शानदार झेल घेतला. पॅट कमिन्स यानं अखेरच्या 6 षटकांमध्ये योग्य प्लॅन करत गोलंदाजांचा वापर केला. जेव्हा गरज पडली, त्यावेळी तो स्वत: चेंडू घेऊन आला अन् विकेटही घेतली. 






पॅट कमिन्सने सामना फिरवला... 


मुंबई धावांचा पाठलाग करताना योग्य त्या ट्रकवर होती. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या धावांचा पाऊस पाडत होती. टाईम आऊटमध्ये पॅट कमिन्स याने प्लॅन आखला. तो स्वत: गोलंदाजीसाठी आला. पॅट कमिन्स याने तिलक वर्मा याला 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद केले. या षटकांमध्ये कमिन्सने फक्त तीन धावा दिल्या आणि तिलक वर्माची महत्वाची विकेट घेतली. तिलक वर्मा धोकादायक ठरत होता. त्याने 34 चेंडूमध्ये 64 धावा चोपल्या होत्या, यामध्ये सहा षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माला तर बाद केलेच, पण धावसंख्याही रोखली. 15 व्या षटकानंतरच सामना फिरला. 






कर्णधार पॅट कमिन्सने संघासाठी हवं ते केलं...


टीम डेविड आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजांना चौकार षटकार मारतात, हे लक्षात घेत उनादकट याला षटक दिले. उनादकट यानं 16 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या. पॅट कमिन्स याने योग्य ते प्लॅन करत मुंबईच्या गोलंदाजांना रोखलं. पॅट कमिन्स 19 वे षटक घेऊन स्वत: आला. या षटकात त्याने फक्त 7 धावा दिल्या. कमिन्स याने सुरुवातीला दोन षटकं महागडी टाकली होती, पण अखेरीस त्यानं भेदक मारा केला. पॅट कमिन्सने रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना बाद केले. त्याशिवाय नमन धीर याचा झेल घेतला.हैदराबाद संघाला जे हवं ते सर्व त्यानं केले. 






पॅट कमिन्सची गोलंदाजी कशी राहिली - 


चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणाऱ्या सामन्यात पॅट कमिन्स यानं कंजूष गोलंदाजी केली. पॅट कमिन्स याने 4 षटकांमध्ये 35 धावा दिल्या. त्याशिवाय त्याने रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना बाद केले. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. पॅट कमिन्सने आजच्या सामन्यात सर्वात कंजूष गोलंदाजी केली.