MI vs SRH, Wankhede Pitch Report : आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या सोळाव्या हंगामातील आज शेवटचे डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या डबल हेडर सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ आमने-सामने येतील. आयपीएल 2023 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) ला आजचा सामना जिंकावा लागेल. आज, 21 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई संघाला सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला पराभूत करावं लागेल शिवाय नेट रनरेट देखील सुधारावं लागेल.
मुंबईची 'पलटन' विरुद्ध हैदराबाद
मुंबई संघ आज शेवटच्या लीग सामन्यासाठी होमग्राऊंड वानखेडेवर परतला आहे. सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा सारखे खेळाडू खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पाच वेळा चॅम्पियन मुंबई पलटनची विजयाची अपेक्षा कायम आहे. पण मुंबई संघाची गोलंदाजीचा सध्या चिंतेची बाब आहे. याउलट, सनरायझर्स हैदराबाद संघाचीही चालू हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ सध्या आयपीएल गुणतालिकेत तळाशी दहाव्या क्रमांकावर आहे.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) मुंबई (MI) विरुद्ध हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Pitch Report) नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. दव पडण्याची शक्यता कमीच आहे.
MI vs SRH Probable Playing 11 : दोन्ही संंघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा, इशान किशन, सुर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, कॅमरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश माधवाल.
SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद
मयंक अग्रवाल, विव्रांत शर्मा, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, हॅरी ब्रूक, नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलीप, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.