MI vs SRH IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केला आहे. मुंबई  (MI) संघाने 14 धावांनी हैदराबादवर (SRH) मात केली. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून हॅटट्रिक केली. कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) च्या संयमी खेळीमुळे मुंबई संघाला विजय मिळवता आला. मुंबई संघाचा मेंटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सामन्यानंतर कॅमेरॉन ग्रीनचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्विटर अकाऊटवर शेअर केला आहे.


MI vs SRH IPL 2023 : मुंबईच्या विजयासाठी कॅमेरॉन ग्रीनची संयमी खेळी


सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्सकडून 40 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. मुंबई संघाने 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कर्णधार एडन मार्करमचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्व गडी बाद झाला. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीनने 40 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. ग्रीनने एकहाती स्ट्राईक सांभाळल्यामुळे मुंबईला 192 धावांचा डोंगर उभारता आला, असं म्हणत सचिन तेंडुलकरने कॅमेरॉन ग्रीनचं कौतुक केलं आहे.


पाहा व्हिडीओ : सचिन तेंडुलकरकडून कॅमेरॉन ग्रीनचं कौतुक






मुंबईकडून हैदराबादचा 14 धावांनी पराभव


आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 24 धावांची गरज होती. एकोणीसाव्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने दमदार गोलंदाजी करत आपल्या संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुनने शेवटच्या षटकात एक गडी बाद केला.


हैदराबाद संघ 178 धावांवर ऑल आऊट


हैदराबादच्या मयंक अग्रवालने 41 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 16 चेंडूत 36 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामने 22 धावांवर बाद झाला. तर, मार्को जॅनसेनने 13 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 10 धावा केल्या. हॅरी ब्रूक 9 धावांवर, तर राहुल त्रिपाठी सात आणि अभिषेक शर्मा एक धावा काढून बाद झाले. संघाला अखेरच्या षटकांमध्ये अब्दुल समदकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित होती, मात्र तो 12 चेंडूत केवळ नऊ धावा करून बाद झाला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं.