IPL 2023 MI vs PBKS Playing 11 : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 46 व्या सामन्यात आज मोहालीतील मैदानावर मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. शेवटच्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केला आहे. तर, तर मुंबई राजस्थानवर विजय मिळवला आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करतील.
MI vs PBKS : मुंबईची 'पलटन' विरुद्ध पंजाबचे 'किंग्स'
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) सामना आज, 3 मे रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आपापल्या मागील सामना जिंकून आजच्या सामन्यात उतरत आहेत. पंजाब किंग्स आयपीएलच्या गुणतालिकेत नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यांतील विजयांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आठ सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला असून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
MI vs PBKS : पंजाबच्या घरच्या मैदानावर रंगणार सामना
आजचा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. आतापर्यंत पंजाबच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी पंजाबला फक्त कोलकाताविरोधातील एक सामना जिंकला आला आहे, हा पंजाबच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना होता. होमग्राऊंडवरील इतर सामन्यांत पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे. या मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला
MI vs PBKS Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
MI Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान
PBKS Probable Playing 11 : पंजाब किंग्स
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम कुरान, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 Points Table : दिल्लीकडून गुजरातचा पराभव, गुणतालिकेत काय बदल? वाचा सविस्तर