MI vs LSG, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या दमदार शतकामुळे मुंबईसमोर त्यांनी 200 धावांचे आव्हान ठेवले. हे पूर्ण करताना मुंबईचे सर्वच फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही खास कमाल दाखवता आली नाही. अखेरच्या काही षटकात पोलार्ड क्रिजवर होता पण तोही मुंबईला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि 18 धावांनी मुंबईचा पराभूत झाला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
MI vs LSG 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मुंबईने प्रथम गोलंदाजी घेऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला. याचे कारण लखनौचा दमदार खेळ ठरला.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाहता क्षणी समोर येणारी गोष्ट म्हणजे केएल राहुलचं दमदार शतक. मुंबईची प्रथम गोलंदाजी असताना देखील राहुलने ठोकलेल्या शतकामुळे मुंबईसमोर 200 धावांचे लक्ष्य होते. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.
- सामन्यात राहुलने डि कॉकसह चांगली सुरुवात केली. पण डि कॉक बाद होताच संघावर प्रेशर आलं. पण याचवेळी राहुलसोबत मयांकने एक उत्तम भागिदारी रचली. ही भागिदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.
- मुंबईकडून गोलंदाजीत खास कामगिरी झाली नसून आज एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली मिसफिल्ड.
- मुंबईचे गोलंदाज खराब कामगिरी करतच होते. त्यात मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या.
- केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
- त्यानंतर दुसऱ्या इनिंगचा विचार करता, 200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर आजही फेल झाले. रोहित सहा तर ईशान 13 धावाच करु शकला.
- संघ अडचणीत असताना तिलक आणि सूर्यकुमारने एक चांगली भागिदारी रचली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. तिलक 26 आणि त्यानंतर सूर्यकुमार 37 धावा करुन तंबूत परतला
- अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. पण त्याची 25 धावांची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही.
- सामन्यात मुंबईची फलंदाजी तर सुमार पाहायला मिळालीच, पण गोलंदाजीमधील अडचणी पुन्हा दिसून आल्या. बुमराहच्या जोडीला एकही चांगल्या फॉर्ममधील गोलंदाज नसल्याने आज मुंबई पराभूत झाली असे म्हणता येईल.
हे देखील वाचा-
- MI vs LSG Result : मुंबईला विजय मिळता मिळेना, लखनौकडून 18 धावांनी मात, स्पर्धेतील सलग सहावा पराभव
- Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स, गुजरातचे चाहते चिंतेत
- Who Is Yash Dayal: पदार्पणाच्या सामन्यात गाजवलं मैदान! कोण आहे यश दयाल? ज्याच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे