DC Vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 27 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, फाफ डू प्लेसिसवर आरसीबीच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयस चँलेजर्स बंगळुरु या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत चांगली झेप घेऊ शकतो. दिल्ली आणि बंगळुरुच्या इतिहासाचा विचार करता आतापर्यंत 26 वेळा दोघे आमने सामने आले असून बंगळुरुने सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली 10 विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. एख सामना अनिर्णीत देखील राहिला आहे. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


पिच रिपोर्ट
दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलचा 27 वा सामना खेळला जात आहे.  या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ पाच पैकी चार वेळा विजेता ठरला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी निवडेल, हे जवळपास निश्चित होतं. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज. 


दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.


हे देखील वाचा-