KL Rahul Century: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुल मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी करत इतिहास रचलाय. मुंबईविरुद्ध सामन्यात केएल राहुलनं 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे.
केएल राहुल हा मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचा शंभरावा आयपीएलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात केएल राहुलनं वादळी खेळी करत केवळ 56 चेंडूत शतक पूर्ण केलं. राहुलचं हे आयपीएलमधील तिसरं आणि मुंबई विरुद्ध दुसरं शतक आहे. केएल राहुलनं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.
आयपीएल 2022 मध्ये शतक ठोकणारा केएल राहुल दुसरा खेळाडू
या हंगामात शतक ठोकणारा केएल राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरनं शतक झळकावलं होतं. राहुलनं मिल्सच्या षटकातील 5व्या चेंडूवर ऑफ साइडमध्ये चौकार मारून आयपीएल 2022 मध्ये पहिले शतक झळकावलंय. त्याचं हे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे दुसरे शतक आहे.
कर्णधार म्हणून दुसरं शतक
कर्णधार म्हणून केएल राहुलचे हे दुसरे शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. आता मात्र तो फलंदाज म्हणून खेळत आहे.
शंभराव्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला
या शतकासह राहुल 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 100व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. त्यानं कोलकाताविरुद्ध 86 धावा केल्या होत्या. केएल राहुलनं आपल्या 100व्या सामन्यात नाबाद 103 धावांची खेळी करत हा विक्रम केलाय.
हे देखील वाचा-
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- Who is Aman Hakim Khan: अपघातानंतरही क्रिकेट सोडलं नाही, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अमन हाकीम खान आहे तरी कोण?
- Rahul Tripathi: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर घोंगावलं राहुल त्रिपाठी नावाचं वादळ, कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडत रचले अनेक विक्रम