GT vs MI, Ranveer Singh Reactions On Rohit Sharma Sixes : मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर हार्दिक पांड्याचा गुजरात आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघाचा सामना होत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील हा 51 वा सामना आहे. या सामन्यात मुंबईला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पोहचला होता. मुंबईच्या संघाला सपोर्ट करताना रणवीर सिंह दिसला. रोहित शर्माच्या चौकार षटकाराला रणवीर सिंह याने दाद दिली. रोहित शर्माच्या षटकारानंतरचा रणवीर सिंहची रिएक्शन व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर रणवीर सिंह ट्रेंड करत आहे. अनेकांनी त्याच्या कपड्याच्या अतरंगी स्टाईलवरही टिप्पणी केली आहे. 


नाणेफेक गमाल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मुंबईकडून रोहित शर्माने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माच्या चौकार षटकारांचा आनंद घेतना रणवीर दिसला. त्याची रिएक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. रोहित शर्माने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने दोन षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला. 






















मुंबईच्या संघात एक बदल -
गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही. 


मुंबईचा संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडेथ




 



गुजरातचा संघ - 
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या(कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन, अलजारी जोसेफ, मोहम्मद शमी