Mi Vs Dc, Ipl 2024 Live Updates : अखेर मुंबईचा पहिला विजय, दिल्लीचा 29 धावांनी पराभव

IPL 2024 MI vs DC live : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यामध्ये आज आमनासामना, कोण बाजी मारणार ?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 07 Apr 2024 07:28 PM
अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता?

Mumbai Indians  vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्सनं अखेर पहिला विजय मिळवला आहे.  दिल्ली कॅपिटल्सवर मुंबईनं 29 धावांनी विजय मिळवला.

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का 

 


दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहनं अभिषेक पोरेलला 41 धावांवर बाद केलं.

दिल्लीचा पलटवार, पृथ्वी शॉ अन् अभिषेक पोरेलनं टेन्शन वाढवलं

मुंबई इंडियन्सनं केलेल्या 234 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं चांगली सुरुवात केली आहे. डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. दिल्लीनं 11 व्या ओव्हरमध्ये 1 बाद 107 धावा केल्या. 

दिल्लीची सावध सुरुवात, 8 ओव्हरमध्ये 1 बाद 69 धावा

दिल्लीनं सावध सुरुवात केली असून 8 ओव्हरमध्ये 1 बाद 69 धावा झाल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आज देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

शेफर्डनं दिल्लीचे वाजवले बारा, शेवटच्या ओव्हरमध्ये 32 धावा काढल्या

मुंबईच्या टीममध्ये पदार्पण करणाऱ्या रोमॅरिओ शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. यामुळं मुंबईनं 20 ओव्हर्समध्ये 5 बाद  234 धावा केल्या. 

मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का, कॅप्टन हार्दिक पांड्या बाद

अखेर मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का बसला आहे.  नॉर्खियाचा बॉल सीमारेषेबाहेर मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. 

मुंबई इंडियन्सच्या 150 धावा

मुंबई इंडियन्सनं 16 व्या ओव्हरनंतर 4 विकेटवर  150 धावा केल्या आहेत. 

मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, ईशान किशन बाद

अक्षर पटेलनं मुंबईच्या सलामीवीरांना माघारी पाठवलं आहे. ईशान किशन 42 धावा करुन बाद झाला.

सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद

चार महिन्यानंतर कमबॅक करणारा सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला आहे. 

मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा 49 धावांवर बाद

मुंबईला पहिला धक्का बसला असून रोहित शर्मा 49 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलनं त्याला बोल्ड केलं. 

मुंबईची आक्रमक सुरुवात,रोहित किशननं डाव सावरला

मुंबई इंडियन्सनं आक्रमक सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि इशानच्या फलंदाजीच्या जोरावर 6 ओव्हरमध्ये 75  धावा केल्या. 

मिचेल मार्श दुखापतग्रस्त

अधीच तळाला असणाऱ्या दिल्लीच्या अडचणी संपायच्या नाव घेत नाहीत. दिल्लीच्या संघातही आज दोन बदल करण्यात आले आहेत. मिचेल मार्श दुखापतग्रस्त असल्यामुळे आजच्या सामन्याला तो उपलब्ध नाही. त्याशिवाय रसीख यालाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिचेल मार्श याच्याजागी झाय रिचर्डसन याला संधी दिली आहे. तर रसिकच्या जागी ललीत यादव याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यात आता मिचेल मार्शही दुखापतग्रस्त झाला आहे. 

मुंबईच्या संघात तीन बदल

दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादवचं कमबॅक झाल्यानंतर मुंबईच्या ताफ्यात तीन बदल करण्यात आले आहेत. नमन धीर या युवा फलंदाजाला बेंचवर बसावं लागत आहे.  रोमिरिओ शेफर्ड आणि मोहम्मद नबी यांनाही प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वेना माफाका आणि ब्रेविस यांना आराम देण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव परतल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे. 

दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये कोणते खेळाडू ?

डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झे रिचर्डसन, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद


Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 David Warner, 3 Abhishek Porel, 4 Rishabh Pant (wk and capt), 5 Tristan Stubbs, 6 Axar Patel, 7 Lalit Yadav, 8 Jhye Richardson, 9 Anrich Nortje, 10 Ishant Sharma 11 Khaleel Ahmed


राखीव खेळाडू - कुमार कुशाग्र, यश धुल, सुमित कुमार, प्रविण दुबे


Subs: Kumar Kushagra, Yash Dhull, Jake Fraser-McGurk, Sumit Kumar, Pravin Dubey

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, जसप्रीत बुमराह


Mumbai Indians: 1 Rohit Sharma, 2 Ishan Kishan, 3 Suryakumar Yadav, 4 Tilak Varma, 5 Hardik Pandya (capt), 6 Tim David, 7 Mohammad Nabi, 8 Romario Shepherd, 9 Piyush Chawla, 10 Gerald Coetzee, 11 Jasprit Bumrah


इम्पॅक्ट प्लेअर - आकाश माधवाल, क्वेना माफाका, नमन धीर, नेहाल वढेरा, सॅम्स मुलानी


Subs: Akash Madhwal, Kwena Maphaka, Naman Dhir, Nehal Wadhera, Shams Mulani

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, जसप्रीत बुमराह

दिल्लीने नाणेफेक जिंकली

वानखेडे मैदानावर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या जवळ

दिल्लीविरोधात 23 धावा करताच रोहित शर्मा मोठा विक्रम करणार.. रोहित शर्माला दिल्लीविरोधात 1000 धावांचा टप्पा पर करण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 





तळाच्या संघात आमनासामना

गुणतालिकेत तळाला असणाऱ्या दोन संघामध्ये आमनासामना होत आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे, तर दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर आहे.

गौरव मोरे मुंबईच्या सपोर्टसाठी मैदानात

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. वानखेडे मैदानावर लढत होणार आहे.

सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या ? (MOST WICKETS IN MI VS DC IPL MATCHES)

 





































गोलंदाजडावविकेटEcon.सरासरीसर्वोत्तम
जसप्रीत बुमराह (MI)19237.5523.434/14
लसीथ मलिंगा (MI)13226.6514.225/13
हरभजन सिंह (MI)17216.6720.194/17
सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? (MOST RUNS IN MI VS DC IPL MATCHES)

 






































फलंदाजडाव धावाStrike Rateसरासरीसर्वोच्च धावसंख्या
रोहित शर्मा (MI)26792128.9933.0074*
इशान किशन (MI)10423148.9470.5081*
वीरेंद्र सेहवाग (DC)10375156.9041.6695*

वानखेडेची खेळपट्टी कशी आहे ? (IPL 2024 MI Vs DC Pitch Report)

वानखेडेच्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. धावांचा पाठलाग कऱणाऱ्या संघाला या मैदानावर नेहमीच फायदा होतो. या मैदानावर आतापर्यंत 112 आयपीएल सामने झाले आहेत. त्यामधील 62 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळला आहे. वानखेडेच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, 71 टक्के विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर वेगवान गोलंदाजांनी 877 विकेट घेतल्या आहेत, तर फिरकी गोलंदाजांना 365 विकेट मिळाल्या आहेत. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 169 इतकी आहे. 

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड (IPL 2024 MI Vs DC Head To Head Record)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये 33 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने 18 वेळा तर दिल्लीने 15 वेळा विजय मिळवला आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील लढती नेहमीच रोमांचक झाल्या आहेत. मुंबईचा दिल्लीविरोधातील सर्वोच्च स्कोर 218 इतका आहे. तर दिल्लीचा मुंबईविरोधात सर्वोच्च स्कोर 213 आहे. दोन्ही संघातील मागील पाच लढतीमध्ये मुंबईला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय, तर दिल्लीने तीन सामन्यात बाजी मारली. 2021 आयपीएलमध्ये मुंबईला दिल्लीविरोधात दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 2023 आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्लीचा दोन वेळा आमनासामना झाला, त्यामध्ये रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  

Probable Playing 11 दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग 11 

 


पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसीख डार सलाम, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद, जेक फ्रेजर मॅकगर्क 

MI Probable Playing 11 मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 

हार्दिक पंड्या (कर्णधार),रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, मोहम्मद नबी, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, टिम डेविड, आकाश मधवाल,   


 

दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्येही बदल ?

दिल्लीच्या ताफ्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि मुकेश कुमार अद्याप तंदुरुस्त झालेले नाहीत. त्यांनी शनिवारी सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. त्याशिवाय आघाडीच्या फळीकडूनही हवी तशी सुरुवात मिळत नाही. पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श अपयशी ठऱले आहेत. वॉर्नरला आणखी संधी मिळणार की दिल्ली नवा डाव खेळणार? याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

सूर्या परतला, मुंबईच्या संघात बदल निश्चित!

दिल्ली आणि मुंबईच्या संघामध्ये काही बदल निश्चित मानले जात आहेत. मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव परतला आहे. दुखापतीनंतर सूर्या मैदानावर परत आलाय. सूर्या परतल्यामुळे मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानले जात आहेत. मुंबईची फिरकी बाजूही कमकुवत जाणवत आहे, त्यामुळे अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याला आज संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्या परतल्यामुळे नमन धीर याला बेंचवर बसवलं जाऊ शकतं. 

पार्श्वभूमी

IPL 2024 MI vs DC live score updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यामध्ये आज आमनासामना होणार आहे. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या दोन संघामध्ये आज मुंबईतील वानखेडेच्या (wankhede stadium mumbai) मैदानावर लढत होत आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.