MI & RCB IPL Playoff Scenario : आयपीएल 2023 (Indian Premier League) चा शेवटचा टप्पा सुरु आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) या तीन संघांनी टॉप-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. एका स्थान शिल्लक असून यासाठी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात लढत सुरु आहे. मुंबई आणि बंगळुरू संघाला त्यांचे शेवटचे साखळी सामने जिंकून टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. तसेच, राजस्थानचा संघ बंगळुरू आणि मुंबईच्या निकालांवर अवलंबून आहे, कारण संघाने आपले सर्व साखळी सामने खेळले आहेत. 


यंदाच्या आयपीएलचा शेवटचा 'डबल हेडर डे'


आज यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या सीझनचा म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मधील शेवटचा डबल हेडर डे (IPL Double Header Day) आहे. म्हणजेच या मोसमात शेवटच्या वेळी एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई आणि हैदराबाद आमनेसामने असतील, तर दुसऱ्या सामन्यात बेंगळुरूचा सामना गुजरातशी होईल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांना आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. त्याउलट जर मुंबई आणि बंगळुरुचा आजच्या सामन्यात पराभव झाल्यास राजस्थान संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची वाट मोकळी होईल.


मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी नेमकं समीकरण काय?


मुंबईचे 13 सामन्यांत सात विजय आणि सहा पराभवांसह 14 गुण आहेत. मुंबई संघाकडे गुण असेल, पण त्यांचा नेट रन रेट खूप कमी आहे. मुंबईचा नेट रन रेट -0.128 आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर आधी हैदराबादविरुद्ध वानखेडेवर होणारा सामना जिंकावा लागेल. त्यानंतर बंगळुरू संघ गुजरातविरुद्धचा सामना हरल्यास मुंबईचा संघ प्लेऑफसाठी थेट पात्र ठरेल. पण, त्याशिवाय त्यांना आरसीबीच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे.


प्लेऑफच्या स्पर्धेत मुंबईपेक्षा आरसीबीचं पारड


मुंबई संघाचा पहिलाच सामना असल्याने मुंबईने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 80 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला किंवा 11.5 षटकांत पाठलाग केला तरच त्यांचा नेट रनरेट वाढेल. बंगळुरूच्या सध्याच्या नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. बंगळुरू संघाने गुजरातवर दोन-तीन धावांनी जिंकला तर मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल आणि आरसीबी पात्र ठरेल. त्यामुळे प्लेऑफच्या स्पर्धेत आरसीबीचं पारड जड आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs GT : आरसीबीची चिंता वाढली! बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी; आजच्या सामन्यावर पावसाचं सावट