Man of the Match winners in IPL finals : अहमदाबादमध्ये आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात आणि धोनीची चेन्नई एकमेंकासमोर उभा ठाकतील. हार्दिक पांड्या दुसऱ्या विजेतापदासाठी तर धोनी पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरले. आतापर्यंतच्या 15 आयपीएलमध्ये मुंबईने पाच तर चेन्नईने चार वेळा विजय मिळवला आहे. पण आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत कोण कोण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेय.. याबाबत तुम्हाला माहित आहे का ? विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला आयपीएल फायनलमध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. 15 आयपीएल फायनलमध्ये 15 जणांनी सामनावीर पुरस्कारावर नाव कोरलेय.

पहिला सामनावीर पुरस्कार कुणी पटकावला ?

आयपीएलचा पहिला सामनावीर पुरस्कार युसूफ पठाण याने पटकावला आहे.  आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यात फायनलची लढथ झाली होती.  या सामन्यात राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण याने फलंदाजी 56 धावांचे योगदान दिले होते. तर गोलंदाजीत तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. युसूफ पठाण याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते. 

Man of the Match winners in IPL finals

वर्षआयपीएल फायनलसामनावीर Man of the Match
2008राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्सयुसूफ पठाण (RR) - 56 (39), 3/22
2009डेक्कन चार्जस vs आरसीबीअनिल कुंबळे (RCB) - 4/16
2010चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्ससुरेश रैना (CSK) - 57* (35), 1/21
2011चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबीमुरली विजय (CSK) - 95 (52)
2012केकेआर vs चेन्नई सुपर किंग्समनविंदर बिसला  (KKR) - 89 (48)
2013मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सकायरन पोलार्ड (MI) - 60* (32)
2014केकेआर vs पंजाब किंग्समनिष पांडे (KKR) - 94 (50)
2015मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा (MI) - 50 (26)
2016सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबीबेन कटिंग (SRH) - 39* (15)
2017मुंबई इंडियन्स vs रायझिंग पुणे सुपरजायंट्सकृणाल पांड्या (MI) - 47 (38)
2018चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबादशेन वॉटसन (CSK) - 117* (57)
2019मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सजसप्रीत बुमराह (MI) - 2/14
2020मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्सट्रेंट बोल्ट (MI) - 3/30
2021चेन्नई सुपर किंग्स vs केकेआरफाफ डु प्लेसिस (CSK) - 86 (59)
2022गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्सहार्दिक पांड्या (GT) - 34 (30), 3/17
2023*चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्सTBD

आणखी वाचा :

15 आयपीएल फायनलमधील आकडेवारी एका क्लिकवर, पाहा सविस्तर