WTC Final 2023 : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडसाठी रवाना झाला असून त्याच्यासोबत युवा खेळाडू यशस्वी जयस्वालही (Yashasvi Jaiswal) रवाना झाला आहे. यशस्वी जयस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची दुसरी बॅच इंग्लंडसाठी रवाना झाली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि युवा स्टार यशस्वी जयस्वालसह इतर खेळाडू रवाना झाले आहे. विराट कोहलीसह टीम इंडियाचे काही सदस्य आधीच इंग्लंडला पोहोचले आहेत.


रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल इंग्लंडसाठी रवाना


यंदाच्या आयपीएलच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं आहे. यशस्वी जयस्वालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTCFinal) साठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता तो टीम इंडियातील इतर सदस्यांसह इंग्लंडला रवाना झाला आहे.


फ्लाईटमधील खास फोटो केला शेअर


यशस्वी जयस्वाल कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियातील इतर सदस्यांसह इंग्लंडसाठी रवाना झाला. यावेळी एकाच विमानानं प्रवास करताना यशस्वीनं रोहित शर्मासोबत खास फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी यशस्वी जयस्वालची निवड 


बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी स्टँडबाय सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट केलं होतं. पण ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयला माहिती दिली आहे, की तो 5 जूननंतरच संघात सामील होऊ शकेल. दरम्यान, यशस्वी जयस्वाल यांच्याकडे यूकेचा व्हिसा असल्याने तो संघात सामील होऊ शकेल. येत्या काही दिवसांत लंडनला जाणार आहे.


India’s squad for WTC final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी टीम इंडिया  


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 


Standby Players : 


ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


WTC Final 2023 भारतीय वेळेनुसार कधी सुरु होणार सामना, सर्व माहिती एका क्लिकवर