Matt Henry Replaced David Willey In LSG : आयपीएल 2024 ला दिमाखात सुरुवात झाली आहे. आठडाभरात अनेक रोमांचक सामने झाले. चौकार-षटकारांचा पाऊसही पडला. आयपीएलची रनधुमाळी सुरु असतानाच लखनौला मात्र मोठा धक्का बसला होता. इंग्लिंश अष्टपैलू डेविड विली (David Willey) यानं खासगी कारणाचा हवाला देत आयपीएलमधून माघार घेतली होती. पण आता लखनौनं त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. लखनौने डेविड विलीच्या जागी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला ताफ्यात घेतले आहे. लखनौच्या ताफ्यात न्यूझीलंडचा घातक गोलंदाज मॅट हेनरी (Matt Henry) दाखल झालाय. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर (एक्स) हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. 


लखनौ सुपर जायंट्सने न्यूझीलंडच्या मॅट हेनरी याला 1.25 कोटींच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतले आहे. आयपीएलने याबाबत माहिती जारी करताना म्हटलेय की, "न्यूझीलंडच्या मॅट हेनरीने आयपीएल 2024 साठी लखनौ सुपर जायंट्ससोबत करार केला आहे. हेनरी हा इंग्लंडचा अष्टपैलू डेविड विली याच्या रिप्लेसमेंटच्या रुपाने लखनौच्या ताफ्यात असेल. डेविड विलीने खासगी कारणामुळे स्पर्धेतून नाम माघारी घेतले होतं. मॅट हेनरीने 1.25 कोटींच्या ब्रेस प्राईजमध्ये लखनौ संघाला ज्वाईन केले आहे."


दरम्यान, मॅट हेनरी याआधीही आयपीएल रनसंग्राला भाग राहिला आहे. मॅट हेनरी हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघाचा सदस्य राहिलाय. मॅट हेनरीने आयपीएलमध्ये 2017 मध्ये दोन सामने खेळले आहेत. हेनरीला चेन्नईकडून पदार्पणची संधीच मिळाली नाही. त्याने फक्त पंजाबकडून दोन सामने खेळले आहेत. 






मॅट हेनरी न्यूझीलंडकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो -  


वेगवान गोलंदाज मॅट हेनरी न्यूझीलंडच्या तिन्ही संघाचा सदस्य आहे. त्याने आतापर्यंत 25 कसोटी, 82 वनडे आणि 17 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हेनरीने कसोटीत 49 डावात फलंदाजी केली, त्यामध्ये 32.41 च्या सरासरीने 95 विकेट घेतल्या आहेत. तर 33 डावात फलंदाजी करताना 600 धावा चोपल्या आहेत. वनडे सामन्यातील 80 डावात गोलंदाजी करताना त्याने 26 च्या सरासरीने 141 विकेट घेतल्या आहेत. 35 डावात फलंदाजी करताना त्याने 255 धावा केल्या आहेत. त्याशिवाय टी 20 मध्ये 16 डावात त्याने 20 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 8.13 प्रतिषटकं धावा दिल्या आहेत.