लखनौ : के. एल. राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज (Punjab Kings) विजयाच्या ट्रॅकवर परतण्याच्या निमित्तानं आमने सामने येतील. लखनौची दुसरी मॅच इकाना स्टेडियमवर होत आहे. लखनौला पहिल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, पंजाब किंग्जनं पहिल्या मॅचमध्ये दिल्लीला पराभूत केलं होतं.दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागंल होतं. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे. 


लखनौला कोणत्या बाबी सुधाराव्या लागणार?


लखनौ सुपर जाएंटसला आजची मॅच जिंकायची असल्यास त्यांना फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. लखनौच्या मुख्य फलदाजांना पहिल्या मॅचमध्ये सूर गवसला नव्हता. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी आणि मार्क्स स्टोइनिस यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आजच्या मॅचमध्ये निकोलस पूरन आणि के.एल. राहुल यांच्यासह पंजाबच्या इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. 


पंजाब विजयाच्या ट्रकवर परतणार?


शिखर धवनच्या पंजाब किंग्जनं आतापर्यंत दोन पैकी एका मॅचमध्ये पराभव स्वीकारला तर एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे.पंजाबला त्यांच्या नेट रनटेमध्ये देखील सुधारणा करावी लागणार आहे. जॉनी बेयरस्टोनं चांगली फलंदाजी केली होती. शिखर धवनचं स्ट्राइक रेट कमी होतं. प्रभासिमरन सिंह आणि सॅम कुरन यांना देखील आजच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 


लखनऊ सुपर जाएंटस संभाव्य प्लेइंग 11


केएल. राहुल (विकेटकीपर, कर्णधार), क्विंटन डीकॉक, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, कुणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, रवि बिश्नोई, मोहसिन खान, नवीन उल हक, यश ठाकूर,


इम्पॅक्ट प्लेअर्स  


के. गौतम,  अमित मिश्रा, आयुष बदोनी, काइल मेयर्स


पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन


शिखर धवन (कर्णधार) जॉनी बेयरस्टो,  सॅम करुन,लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर) शशांक सिंह, हरप्रीत बरार, हर्षल पटेल,कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह,


संभाव्य इम्पॅक्ट प्लेअर


ऋषी धवन, प्रभासिमरन सिंह, मोहित राठी, अथर्व तायडे  


पंजाब आणि लखनौ यांच्यातील मॅचमध्ये इकाना स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. निकोलस पूरन, केएल. राहुल, स्टॉयनिस या सारखे खेळाडू मोठी फटकेबाजी करु शकतात. गेल्या हंगामात इथं स्पिनर्सला  मदत मिळाली होती. मॅचच्या सुरवातीच्या वेळी तापमान जवळपास 32 अंश सेल्सिअस इतकं असेल. 


संबंधित बातम्या :


...तर विराटनं केकेआर विरुद्ध 120 धावा केल्या असत्या, माजी क्रिकेटपटूनं आरसीबीच्या फलदाजांचे कान टोचले


IPL 2024 : आरसीबीच्या बॉलिंगला चोपणाऱ्या सुनील नरेनला काही कळलंच नाही, मयंक डागरचा बॉल थेट स्टम्पवर आदळला, पाहा व्हिडीओ