RR vs LSG Match Prediction : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 26 वा सामना (LSG vs RR) बुधवारी, 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात पाहायला मिळणार आहे. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान आणि लखनौ यांच्यात लढत पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामात राजस्थान संघ सुरुवातीपासूनच चांगल्या स्थितीत आहे. आयपीएल 2022 पासून राजस्थानने आपला चमकदार फॉर्म सुरू ठेवला आहे. 


RR vs LSG IPL 2023 : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी?


आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने जिंकून हॅटट्रिक मारली आहे. त्यानंतर लखनौ राजस्थान विरोधात मैदानात उतरणार आहे. लखनौने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला दोन गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाच्या आयपीएलमधील आघाडीच्या दोन संघांमध्ये आजचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.


LSG vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थान संघाचं पारड जड दिसून आलं आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला एकही सामने जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


RR vs LSG, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


राजस्थान (RR) आणि लखनौ (LSG) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअम संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RR vs LSG Playing 11 : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी? हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...