LSG vs RR, IPL 2022: सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) 41 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघानं लखनौ सुपर जायंट्ससमोर (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) 179 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 20 षटकात 6 विकेट्स गमावून राजस्थानच्या संघानं 178 धावा केल्या. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघानं 12 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. त्यांचे 14 गुण आहेत. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानसाठी पुढील सामना त्यांच्यासाठी करो या मरोचा असेल. यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी राजस्थानचा प्रयत्न करेल.


दरम्यान, प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघाला जोस बटलरच्या रुपात पहिला झटका बसला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांत 64 धावांची भागेदारी झाली. परंतु, नवव्या षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन (32 धावा) आऊट झाला. त्यानंतर बाराव्या षटकात यशस्वी जैस्वालही (41) बाद झाला. हे दोघे आऊट झाल्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी मैदानात आलेल्या देवदत्त पडिक्कल 18 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. लखनौकडून रवी बिश्नोईनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खान, जेसन होल्डर आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली आहे.


संघ-


लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: 
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, आवेश खान.


राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: 
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मेकॉय.


हे देखील वाचा-