IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली आहे. ज्यामुळं चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलंय. आज गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या हंगामातील हा चेन्नईच्या संघाचा नववा पराभव होता. मात्र, या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) 49 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 53 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar)  खास विक्रम मोडला आहे. 

या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या सुरुवातीच्या 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरनं त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिल्या 35 डावात 1 हजार 170 धावा केल्या. तर, ऋतुराज गायकवाडनं त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 35 डावात 1 हजार 205 धावा केल्या आहेत. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतच्या नावावर 1 हजार 85 धावांची नोंद आहे.  तर, चेन्नईचा माजी क्रिकेटपटू 1 हजार 49 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

आयपीलच्या पहिल्या 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडूंची यादी-

क्रमांक फलंदाजांचं नाव धावा
1 ऋतुराज गायकवाड 1205
2 सचिन तेंडुलकर 1170
3 रिषभ पंत 1085
4 सुरेश रैना 1049

चेन्नईचा सात विकेट्सनं पराभव
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 चा 62 वा सामना रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं 19.1 षटकांतच विजय मिळवला. 

हे देखील वाचा-