CSK vs GT, IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने आयपीएलमध्ये पदार्पणातच वादळी सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ सुसाट आहे. गुजरात संघाने आतापर्यंत 13 सामन्यात 10 विजय मिळवले आहेत. 20 गुणांसह गुजरात संघ गुणतालिकेत अव्ल स्थानावर आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा गुजरातचा संघ पहिला आहे. 


गुजरातच्या संघ इतका यशस्वी का आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.. मुंबई आणि चेन्नईसारखे आयपीएलमधील यशस्वी संघ आयपीएलमधून बाहेर पडलेत. पण गुजरातसारख्या नवख्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. पण यामागील गुपित काय..? गुजराताचा संघ सांघिक कामगिरीच्या जोरावर यशस्वी ठरतोय. गुजरात संघाच्या प्रत्येक विजयाचा वेगळा हिरो राहिलाय. कुणा एका खेळाडूवर हा संघ अवलंबून नाही... प्रत्येक वेळी वेगळा खेळाडू संघाला विजय मिळवून देतोय. गुजरातच्या यशाचे हेच खरं गुपित आहे, असं म्हटल्यास वावगे वाटायला नको. 


प्रत्येक सामन्यात वेगळा हिरो... 10 सामन्यात आठ जण ठरले सामनावीर पुरस्काराचे मानकरी... गुजरात संघाकडून फक्त शुबमन गिल याला दोन वेळा सामनाविर पुरस्कार मिळाला आहे. अन्यथा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळाडूने गुजरातला विजय मिळवून दिलाय. 


पाहा दहा सामन्यात कुणी मिळवलाय सामनावीर पुरस्कार - 
मोहम्मद शामी
लॉकी फर्गुसन
शुभमन गिल
हार्दिक पाड्या
डेविड मिलर
राशिद खान
राहुल तेवातिया
शुभमन गिल
वृद्धीमान साहा


दहा सामन्यात गुजरात संघातील नऊ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. हैदराबादविरोधात विजयानंतरही उमरान मलिकना सामनावीर पुरस्कारेन गौरवण्यात आले होते. या सामन्यात मलिकने पाच विकेट घेतल्या होत्या.  






महत्त्वाच्या इतर बातम्या