LSG Vs RCB, IPL 2022: नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं लखनौला (Lucknow Super Giants Vs Royal Challengers Bangalore) 18 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघानं 20 षटकात सहा विकेट्स गमावून 181 धावा केल्या आहेत. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावून 163 धावा करू शकला.


नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातील पहिल्याच षटकात अनुज रावतच्या रुपात बंगळुरूच्या संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. दरम्यान, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरला. परंतु, पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्रुणाल पांड्यानं मॅक्सवेलला माघारी धाडलं. त्यानं 11 चेंडूत 23 धावा केल्या. परंतु, फाफ डू प्लेसिसनं संघाची एक बाजू संभाळली. त्याने अखरेच्या षटकापर्यंत फलंदाजी करत 64 चेंडूत 96 धावा केल्या. फाफ आपलं शतक पूर्ण करेल, असं वाटतं असताना दुष्मंता चमिरानं त्याला झेल बाद केलं. लखनौकडून दुष्मंता चमिरानं आणि जेसन होल्डर यांनी प्रत्यकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, क्रुणाल पांड्यानं एक विकेट्स मिळवली.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिलेल्या 182 लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखौनच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात लखनौचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पाड्यानं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, कर्णधार केएल राहुलनं 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्यानंतर लखनौच्या कोणत्याही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं लखनौच्या संघाचा 18 धावांनी पराभव झाला. बंगळुरूकडून जॉश हेजलवूडनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हर्षल पटेलनं दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेता आली आहे. 


हे देखील वाचा-