Former Bangladesh Fast Bowler Samiur Rahman Dies: भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या लीग आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू असताना क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू समिउर रहमान याचं आज निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ब्रेन ट्यमूरच्या आजारानं ग्रस्त होते. ज्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती. 


समीउर रहमाननं 1986 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. समीर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांनी बराच काळ सामनाधिकारीची भूमिका बजावली. दरम्यान, 1982 आणि 1986 मध्ये आयसीसी ट्राफीत बांगलादेशच्या संघाचे भाग होते. त्यांनी ढाका प्रीमियर लीगमध्ये अबाहानी, मोहम्मदन स्पोर्टिंग, बांग्लादेश विमान, कलाबागन आणि आझाद बॉईज अँड ब्रदर्स युनियनकडून खेळताना अधिक गौरवशाली कारकिर्दीचा आनंद लुटला. राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी बारिसालचं प्रतिनिधित्व केलं होतं.


बांगलादेश क्रिकेटबोर्डाचं ट्वीट-



विशेष म्हणजे, त्यांना ढाका स्पर्ससाठी बास्केट बॉल खेळलं होतं. याबाबत इएसपीएन क्रिकइन्फोच्या एका अहवालात सांगण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीनंतर पंच आणि सामनाधिकारी म्हणून काम केलं. त्यांच्या कुटुंबियात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्याचे भाऊ युसूफ रहमान सध्या अमेरिकेत आहेत, जे माजी क्रिकेटपटू होते.


हे देखील वाचा-