IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जायंट्सचा (GT Beats LSG) 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) फलंदाजी करण्यासाठी आला. गुजरातविरुद्ध त्यानं फक्त चारच चेंडू खेळले. राशिद खानच्या पहिल्या दोन चेंडूवर त्यानं सलग दोन षटकार मारले. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट बॉल ठरला. तर, चौथ्या चेंडूवर त्यानं आपली विकेटस गमावली. परंतु, या सामन्यात आवेश खान सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला. ज्यामुळं त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात अनेक सिंक्सर किंग होते. परंतु आवेश खानने या सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने लेट्स क्रेकइट सिक्स पुरस्कार जिंकला. सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि 1 लाख रुपयांचा धनादेश अनएकेडमीकडून दिला जातो.
दरम्यान, लखनऊ आणि गुजरात यांच्यात झालेल्या या सामन्यात तीन फलंदाजांनी षटकार ठोकले. यापैकी दोन फलंदाजांनी प्रत्येकी एक-एक षटकार ठोकला होता. तर, आवेश खाननं सलग दोन षटकार ठोकले होते. गुजरातकडून डेव्हिड मिलरनं षटकार मारला. तर लखनौकडून क्विंटन डी कॉकने जबरदस्त फटकेबाजी केली. त्याचवेळी डावाच्या अखेरीस आवेश खाननं राशिद खानचं दोन चेंडू पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
गुजरातच्या संघानं दिलेल्या 145 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या.
हे देखील वाचा-
LSG vs GT: आयपीएलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच क्रुणाल पांड्या असा झालाय आऊट
LSG vs GT: लखनौच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीर खेळाडूंवर भडकला, म्हणाला...