IPL 2022: मुंबई इंडिन्यस आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात आयपीएल 2022 चा 56 सामना खेळण्यात आला. या सामन्यात कोलकात्याच्या संघानं 52 धावांनी मुंबईचा पराभव केला.  विशेष म्हणजे, या सामन्यात कोलकात्याच्या संघ एक दोन नव्हेतर चक्क बदल करून मैदानात उतरला होता. हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) अशी एक गोष्ट सांगितली. ज्यामुळं सर्वजण हैराण झालं. या सामन्यात कोणत्या 11 जणांना खेळवायचं? याचा निर्णय संघाचे सीईओ वेंकी म्हैसूर (Venky Mysore) यांनी घेतला, अशी माहिती श्रेयस अय्यरनं दिली. ज्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली.


कोण आहेत वेंकी म्हैसूर?
म्हैसूर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे. ते यापूर्वी सन लाइफ फायनान्शिअल, एसएलएफसी इंश्युरन्स लिमिटेड आणि मेटलाईफ इंडिया इंश्युरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. वेंकी म्हैसूर यांचा क्रिकेटशी दीर्घकाळ संबंध आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी मद्रास विद्यापीठाकडून क्रिकेट खेळलं आहे. वेंकी म्हैसूर रणजी करंडक खेळण्याच्या मार्गावर होते, परंतु त्याच्या वडिलांनी त्याला खेळ सोडून एमबीए करण्यास भाग पाडले. ज्यामुळं वेंकी 1985 मध्ये अमेरिकेत गेले.


सीईओचा हस्तक्षेप संघासाठी घातक ठरण्याची शक्यता
विशेष म्हणजे, मुंबईविरुद्ध कोलकात्यानं सामना गमावला असता तर, त्याला कोण जबाबदार असतं. संघात कोणत्या खेळाडूला खेळवायचं आणि कोणाला बाहेर बसवायचं याची जाणीव कर्णधार आणी प्रशिक्षकांना असते. दरम्यान, संघ निवडीत सीईओचा हस्तक्षेप असेल तर संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम होऊ शकतो.


कोलकात्याच्या प्लऑफमध्ये पोहचण्याच्या आशा अजूनही जिवंत
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकात्याची सुरुवात खराब झाली. मात्र, अजूनही कोलकात्याचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला नाही. कोलकात्यानं या हंगामात 12 सामने खेळले आहेत. त्यापेकी पाच सामने जिंकले आहेत. दरम्यान, 10 गुणांसह कोलकात्याचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहे. उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवळल्यानंतर कोलकात्याचे 14 गुण होतील. इतर 14 गुण असलेल्या संघापेक्षा कोलकात्याचा रनरेट चांगला असल्यास त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळू शकते.


हे देखील वाचा-