IPL 2022 Playoff  : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरलाय. यंदाच्या हंगामात गुजरात आणि लखनौ संघ नव्याने जोडले गेले. या दोन्ही संघाने यंदाच्या हंगमावर वर्चस्व गाजवलेय. गुजरात आणि लखनौ संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विजयासह गुजरातच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा गुजरात पहिला संघ आहे. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने यंदा सुसाट कामगिरी केली आहे. गुजरातने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचे फक्त तीन पराभव झाले आहेत. आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारा गुजरात पहिला संघ ठरलाय. 






गुणतालिकेत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.. तर 12 सामन्यात 8 विजयासह लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत लखनौचा संघ आघाडीवर आहे. त्याशिवाय राजस्थान आणि आरसीबीचा संघ प्रत्येक 14 - 14 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. लखनौ, राजस्थान आणि आरसीबी सध्या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याशिवाय दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि पंजाब यांचे प्रत्येकी दहा दहा गुण आहेत. यांनाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाटी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबई आणि चेन्नई या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांना यंदाच्या हंगमात चांगली कामगिरी करता आलेली नाही. 






लखनौचा 82 धावांत खुर्दा -
राशिद खान याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला. माफक 144 धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. लखनौचा संपूर्ण संघ 82 धावांत संपुष्टात आला. गुजरातने दिलेल्या माफक 144 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. डिकॉकने 11 तर राहुलने 8 धावा केल्या. दीपक हुडाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही फंलदाजाने त्याला साथ दिली नाही. दीपक हुडाने 27 धावांची छोटेखानी खेळी केली. करण शर्मा 4, क्रृणाल पांड्या 5, आयुष बडोनी 8, मार्कस स्टॉयनिस 2, जेसन होल्डर 1, मोहसीन खान 1 आणि आवेश खान 12 धावा काढून बाद झाले. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान याने भेदक मारा केला. राशिदने 3.5 षटकात 24 धावा देत चार गड्यांना बाद केले.  आर साई किशोर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मोहम्मद शामीने एक विकेट घेतली. शामीने तीन षटकात फक्त पाच धावा दिल्या.