Lockie Ferguson, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात दमदार खेळ अगदी सुरुवातीपासून दिसून येत आहे. 5 व्या षटकातचं गुजरातच्या लॉकी फर्ग्यूसनने (Lockie Ferguson) तब्बल 157.3 किमी प्रतितासाच्या वेगाने टाकलेला हा चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉन टॅटने (shaun tait) टाकला होता, त्या रेकॉर्डशी लॉकीने बरोबरी केली आहे. दोन्ही चेंडू 157.3 किमी प्रतितासाच्या वेगाने टाकण्यात आले आहेत. दरम्यान लॉकीने टाकलेल्या या वेगवान डिलेव्हरीमुळे त्याने उमरान मलिक (Umran Malik) याच्या 157 किमी प्रतितासाने फेकलेल्या यंदाच्या वेगवान डिलेव्हरीला मागे टाकले आहे.


आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज 



  1. शॉन टैट – 157.3kmph

  2. लॉकी फर्ग्यूसन - 157.3kmph

  3. उमरान मलिक – 157kmph.

  4. एनरिक नॉर्खिया – 156.2kmph.

  5. उमरान मलिक – 156kmph.

  6. एनरिक नॉर्त्जे – 155.2kmph


आयपीएल इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या शॉन टैटने (Shaun Tait) सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. शॉन टैटने तब्बल 157.3kmph वेगाने चेंडू टाकला होता. उमरान मलिकने देखील काही दिवसांपूर्वी 157 kmph च्या वेगाने चेंडू फेकत या विक्रमच्या जवळ पोहचण्याचा कारनामा केला होता. पण आज लॉकीने 157.3 kmph वेगाचा चेंडू टाकत उम्रानला मागे टाकलं आहे.  



उमरानचा वेगवान सीजन


उमरान मलिक याला लॉकीने मागे टाकलं आहे, पण उमरानने मात्र हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्याने एका सामन्याच्या 19 व्या षटकात 153kmph, 145kmph, 154kmph, 157kmph आणि 156 kmph च्या वेगाने गोलंदाजी केली. याशिवाय गुजरातविरुद्ध 25 धावात 5 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून यासाठी त्याचा संघ पराभूत होऊनही त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता.


हे देखील वाचा-