GT vs RR Final IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना आज होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असतील. गुजरात संघाने पदार्पणाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली...तर राजस्थानने दुसऱ्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आयपीएलच्या फायनल सामन्यांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा असे होतेय की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि धोनीपैकी एकही खेळाडू फायनल खेळत नाही...
2014 मध्ये झालं होतं पहिल्यांदा -
रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यापैकी एकही खेळाडू फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही, आयपीएलच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा होतेय. याआधी 2014 मध्ये असं पहिल्यांदा घडले होते. त्यावेळी हे तिन्ही दिग्गज फायनलमध्ये खेळताना दिसले नव्हते. 2014 मध्ये कोलकाता आणि पंजाब यांच्यामध्ये फायनलची लढत झाली होती.. आयपीएलच्या 15 वर्षात आता दुसऱ्यांदा तिन्ही दिग्गज फायनलमध्ये दिसणार नाहीत.. तसेच आणखी एक महत्वाचे... आयपीएल फायनल होणाऱ्या दोन्ही संघाचे कर्णधार भारतीय असण्याची पहिलीच वेळ आहे. आयपीएलच्या 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलेय. नाणेफेकीला उतरताच हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांच्या नावावर हा विक्रम जमा होणार आहे.
धोनी 10 फायनल खेळलाय..
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019 आणि 2021 मध्ये फायनलला पोहचली होती. यादरम्यान चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल चषक उंचावलाय. त्याशिवाय धोनी रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग राहिलाय. 2017 मध्ये पुणे संघाने फायनलमध्ये धडक मारली होती..
रोहित शर्मा किती वेळा फायनल खेळलाय -
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. मुंबईचा संघ सहा वेळा फायनलमध्ये पोहचलाय.. पण 2010 मध्ये मुंबईला डेक्कन चार्जर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.. त्यावेळी रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता.. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल चषक उंचावलाय.
विराट कोहली तीन फायनलचा भाग -
आयपीएलमध्ये विराट कोहली तीन वेळा फायनलचा भाग राहिलाय. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली तीन वेळा फायनल खेळलाय. 2011, 2009 आणि 2016 मध्ये विराट कोहली आरसीबीकडून फायनलमध्ये खेळलाय.
म्हणजेच..2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 यावेळी सर्व फायनलमध्ये रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहलीपैकी एक जण होताच..