Latest Points Table IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 67 धावांनी पराभव केला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 267 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात दिल्लीने 19.1 षटकांत 199 धावा केल्या. हैदराबादच्या या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचे 7 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. आता सनरायझर्स हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्या स्थानावर तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ चौथ्या स्थानावर घसरले आहे.


सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या प्ले ऑफ फेरीच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचे 8 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे 6-6 गुण असले तरी मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट चांगला आहे.


गुणतालिकेत राजस्थानचे वर्चस्व-


गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा दबदबा कायम आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचे 7 सामन्यांत 12 गुण आहेत. यानंतर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. उर्वरित संघांबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्स 7 सामन्यांत 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज 7 सामन्यांत 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 7 सामन्यांत 2 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.






ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर-


ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेडने 6 सामन्यात 324 धावा केल्या आहेत. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात 37 धावांचे अंतर आहे. यानंतर अनुक्रमे रियान पराग, रोहित शर्मा आणि केएल राहुल यादीत आहे.


संबंधित बातम्या:


विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा


ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo


कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video