Latest Points Table IPL 2024: राजस्थान रॉयल्सने (RR) मुंबई इंडियन्सचा (MI) 9 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळताना मुंबईने 20 षटकांत 179 धावा केल्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्मा आणि निहाल वढेरा यांनी शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली कारण जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी पॉवरप्ले षटकांतच संघाची धावसंख्या 60 च्या पुढे नेली.
जॉस बटलरने 25 चेंडूत 35 धावांची खेळी खेळली, पण जैस्वालने सर्वाधिक प्रभावित केले. आयपीएल 2024 मध्ये जैस्वालने प्रथमच 50 धावांचा टप्पा ओलांडला, ज्याचे त्याने शतकात रूपांतर केले. जैस्वालने 60 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 7 षटकार मारले. पहिल्या 10 षटकात राजस्थान रॉयल्सने 1 गडी गमावून 95 धावा केल्या होत्या. पुढच्या 5 षटकांत संघाच्या 56 धावा झाल्या होत्या. राजस्थानला विजयासाठी 18 चेंडूत फक्त 10 धावा करायच्या असल्याने सामना एकतर्फी झाला होता. संजू सॅमसननेही 27 चेंडूत 38 धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेवटी जैस्वालने चौकार मारत विजयी फटकेबाजी करत राजस्थानचा 9 विकेट्स राखून विजय निश्चित केला. राजस्थानच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
गुणतालिकेची काय स्थिती-
सध्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 8 सामने खेळले असून 7 सामने जिंकले, तर एक सामन्यात पराभव झाला. राजस्थानचे सध्या 14 गुण आहेत. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद देखील 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा संघाने 7 सामन्यात 4 विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर, मुंबई इंडियन्स 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा 8 सामन्यात 3 विजय आणि 6 पराभव झाला आहे. दिल्लीचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानावर असून पंजाब 4 गुणांसह नवव्या, तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
आज चेन्नई विरुद्ध लखनौचा सामना-
आयपीएल 2024 च्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत सध्या चेन्नई चौथ्या, तर लखनौ पाचव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या:
विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा