IPL 2022 Marathi News : कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल आयपीएलच्या 15 व्या हंगमात पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. दोघांमध्ये पर्पल कॅपसाठी स्पर्धा सुरु आहे. पण आयपीएलआधी कुणी म्हटले असते की कुलदीप आणि चहल यंदा सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत तर सर्वांनी त्याला वेड्यात काढले असते. पण यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी दमदार प्रदर्शन करत टीकाकारांना आणि आपल्या आधीच्या संघांना उत्तर दिलेय. आयपीएलच्या 15 व्या हंगामात एक फिरकीपटू तुफान ठरतोय तर दुसरा वादळ... दोघाच्याही गोलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाची भंबेरी उडत आहे. 


 कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल यांनी आपल्या पूर्वीच्या संघाचा बदला घेतला आहे. कुलदीपने कोलकात्याविरोधात मॅच विनिंग गोलंदाजी केली तर चाहलने आरसीबीविरोधात भेदक मारा केला. कोलकात्याने कुलदीपला दोन वर्ष बेंचवर बसवले होते... तर आरसीबीने चहलला रिटेन केले नव्हते. दोन्ही खेळाडूंनी एकप्रकारे बदलाच घेतला.
 
गौतम गंभीरने कोलकात्याचं कर्णधारपद सोडल्यानंतर कुलदीप यादवसोबत नेहमीच अन्याय झाला. दिनेश कार्तिक आणि मॉर्गनच्या नेतृत्वात कुलदीपला बेंचवरच बसावे लागले. त्यामुळे कुलदीप यादवचे मानसिक खच्चीकरण झाले असेल. कुलदीप यादवला भारतीय संघातील स्थानही गमावावे लागले. 


दुसरीकडे आरसीबीने चाहलला रिटेन केले नाही. इतकेच नाही तर लिलावात बोलीही लावली नाही. भारतीय संघामध्ये कुलदीप चहलची जोडीने धमाल उडवून दिली होती. दोघांच्या गोलंदाजीपुढे अनेक फलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. या दर्जेदार फिरकीपटूवर कोलकाता आणि आरसीबीने विश्वास दाखवला नाही. त्यामुळेच या संघाना त्यांच्या रोषाला सामोरं जावे लागले. महत्वाचं म्हणजे, यंदा दिल्लीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कुलदीप यादव आहे. तर राजस्थानकडून सर्वाधिक विकेट घेणारा यजुवेंद्र चहल आहे. 


चायनामेन कुलदीप यादवने आठ सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. कोलकाता विरोधात झालेल्या दोन्ही सामन्यात कुलदीपने चार चार विकेट घेण्याचा करिश्मा केला. कुलदीप चार वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलाय.  दुसरीकडे कुलदीप यादवने आरसीबीविरोधात भेदक मारा करत दोन विकेट घेतल्या. तसेच विराट कोहलीला धावबाद केले. तसेच कार्तिकलाही धावबाद केले. चहलच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फंलदाजांना धावा काढता आल्या नाहीत. कुलदीपने आठ सामन्यात आतापर्यंत 18 विकेट घेतल्या आहेत.  आयपीएलमधील कामगिरीमुळे कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल म्हणजेच कुलच्याची जोडी भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात ही जोडी खेळताना दिसू शकते. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -
राजस्थान रॉयल्स, युजवेंद्र चहल: 18 विकेट
दिल्ली कॅपिटल्स, कुलदीप यादव: 17 विकेट
सनराइजर्स हैदराबाद, उमरान मलिक: 15 विकेट
सनराइजर्स हैदराबाद, टी. नटराजन: 15 विकेट
कोलकाता नाइटराइडर्स, उमेश यादव: 14 विकेट