KKR vs PBKS, IPL 2024 : सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यानं निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 261 धावांपर्यंत मजल मारली. सॉल्ट यानं 75 तर नारायण यानं 71 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीपनं दोन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी 262 धावांचं आव्हान मिळालं आहे.
कोलकात्याची वादळी सुरुवात -
पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकात्याच्या सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट जोडीनं पंजाबच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले. सॉल्ट आणि नारायण यांनी पहिल्या चेंडूपासूनच पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सॅम करन, रबाडा, अर्शदीप आणि हर्षल पटेल यांची गोलंदाजी फोडून काढली. या जोडीने पॉवरप्लेमध्येच 76 धावांचा पाऊस पाडला. तर 48 चेंडूमध्ये 100 फलकावर झळकावलं. सुनिल नारायण यानं 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं, तर सॉल्ट यानं 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. नारायण आणि सॉल्ट यांनी 10.2 षठकात 1138 धावांची भागिदारी केली. यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी सलामीची भागिदारी ठरली.
नारायणचं वादळ -
सुनिल नारायण यानं नेहमीप्रमाणेच चौफेर फटकेबाजी केली. नारायण यानं पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. नारायण यानं 222 च्या स्ट्राईक रेटने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नारायण यानं 32 चेंडूमध्ये 71 धावाचा पाऊस पाडला. सुनिल नारायण यानं आपल्या वादळी खेळीमध्ये चार गगनचुंबी षटकार ठोकले. त्याशिवाय नऊ चैकारांचा पाऊस पाडला.
फिलिप सॉल्टचं धमाकेदार अर्धशतक -
सुनिल नारायण आणि सॉल्ट यांनी दोन्ही बाजूंनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सॉल्ट यानेही नारायण प्रमाणेच प्रत्येक चेंडू सिमापार पाठवयचा प्रयत्न केला. सॉल्ट यानं 202 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या. सॉल्ट आणि नारायण यांनी शतकी भागिदारी केली. सॉल्ट यानं 37 चेंडूमध्ये 75 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.
कोलकात्याचा फिनिशिंग टच -
नारायण आणि सॉल्ट यांनी शानदार सुरुवात दिल्यानंतर उर्वरित फलंदाजांनी फिनिशिंगचं काम चोख बजावलं. आंद्रे रसेल यानं 12 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. रसेल यानं दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले. तर श्रेयस अय्यर यानं 10 चेंडूमध्ये 28 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये श्रेयस अय्यर यानं तीन षटकार आणि एक चौकार ठोकला. रिंकू सिंह चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. रमणदीप तीन चेंडूत सहा धावा काढून नाबाद राहिला. वेंकटेश अय्यरनं शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली वेंकटेशनं 23 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आमि तीन चौकारांचा समावेस आहे.
पंजाबची गोलंदाजी कशी राहिली ?
कोलकात्याविरोधात पंजाबच्या गोलंदाजांना भेदक मारा करता आला नाही. कगिसो रबाडा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. रबाडानं तीन षटकात 52 धावा खर्च केल्या, एक विकेटही मिळाली नाही. अर्शदीप सिंह यानं चार षटकात 45 धावा खर्च केल्या, त्याला दोन विकेट मिळाल्या. सॅम करन यानं चार षटकात 60 धावा खर्च करत एक विकेटघेतली. हर्षल पटेल यानं तीन षटकात 48 धावा खर्च करत एक विकेट घेतली. राहुल चाहर यानं 4 षटकात 33 धावा खर्च करत एक विकेट घेतली.