SRH vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या चषकावर नाव कोरले आहे. कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेट आणि 57 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिलेले माफक आव्हान कोलकात्याने दोन विकेट आणि 63 चेंडूमध्ये सहज पार केले. कोलकात्याकडून वेंकेटेश अय्यर याने नाबाद अर्धशतक ठोकले. कोलकात्याने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले, याआधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकात्याने चषकावर नाव कोरले होते. 


हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सुनिल नारायण फक्त 6 धावा काढून बाद झाला. पॅट कमिन्स याने त्याला दुसऱ्याच षटकात तंबूत धाडले. त्यानंतर गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांनी हैदराबादची गोलंदाजी फोडली. दोघांनी 45 चेंडूमध्ये 91 धावांची शानदार भागिदारी केली. गुरबाजने 32 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 2 षटकार आणि पाच चौकार ठोकले. शाहबाद अहमद याने गुरबाजला बाद केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेरीस श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादची गोलंदाजी फ्लॉप ठरली.



वेंकटेश अय्यर याने पुन्हा एकदा शानदार अर्धशतक ठोकले. वेंकटेश अय्यरने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अय्यरने 26 चेंडूमध्ये नाबाद 52 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. श्रेयस अय्यर याने नाबाद सहा धावांची खेळी केली. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.






कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. कोलकात्यानं याआधी २०१२ आणि २०१४ साली आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची किंग ठरली आहे. कोलकात्यानं चेन्नईतल्या आयपीएल फायनलनवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव ११३ धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल ५७ चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद ५२ धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं ३९ धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं १९ धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.