KKR vs CSK, IPL 2023 :  कोलकात्याचा कर्णधान नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. लॉर्ड शार्दूल ठाकूर आजही प्लेईंग ११ मध्ये नाही. कोलकात्याने मनदीप सिंह याच्या जागी एन जगदीशन याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली आहे. त्याशिवाय डेविड वाइस कोलकात्याकडून पदार्पण करत आहे. लिटन दास याला प्लेईंग ११ च्या बाहेर बसवले आहे.  ?


पाहा दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे.. कोण कोण आहे अंतिम ११ मध्ये ?


KKR XI : 1 एन जगदीशन (विकेटकीपर), 2 जेसन राय, 3 नीतीश राणा (capt), 4 आंद्रे रसेल, 5 रिंकी सिंह, 6 सुनील नारायण , 7 डेविड वाइस, 8 कुलवंत खजोरीया, 9 सुयेश शर्मा, 10 उमेश यादव, 11 वरुण चक्रर्वर्ती


CSK XI : 1 ऋतुराज गायकवाड, 2 डेवेन कॉनवे , 3 अजिंक्य रहाणे , 4 मोईन अली, 5 शिवम दुबे, 6 अंबाती रायडू , 7 रविंद्र जाडेजा , 8 एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर ), 9 तुषार देशपांडे, 10 महिश तीक्षणा , 11 मथिशा पथीराणा


CSK vs KKR IPL 2023 : चेन्नई की कोलकाता कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 33 व्या सामन्यात रविवारी, 23 कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामना ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता संघ पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे तर, चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव केला. तसेच कोलकाता संघ दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर आज चेन्नई विरुद्ध मैदानात उतरणार आहे 


CSK vs KKR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे. चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.