KKR vs SRH, IPL 2022 : आंद्रे रसेल (49) आणि सॅम बिलिंग्स (34) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत सात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावांपर्यंत मजल मारली आहे. उमरान मलिकच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी ढासळली होती. पण आंद्रे रसेल आणि बिलिंग्स यांनी वादळी खेळी करत कोलकात्याला सन्माजनक धावसंख्यापर्यंत पोहचवलं. हैदराबादला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिलेय. 


बिलिंग्स-रसेलने डाव सांभाळला -
कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी श्रेयसचा निर्णयावर पाणी फेरले. हैदराबादच्या गोलंदाजांनी दुसऱ्याच षटकात  वेंकटेश अय्यरचा अडथळा दूर केला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. अजिंक्य रहाणे 28 तर नीतीश राणा 26 धावा काढून बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर 15 धावा काढून बाद झाला... रिंकू सिंह 5 धावा काढून बाद झाला.. पाच विकेट झटपट पडल्यानंतर सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. दोघांनी आधी संयमी फलंदाजी केली, त्यानंतर हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. पण मोक्याच्या क्षणी सॅम बिलिंग्सला भुवनेश्वर कुमारने बाद केले. सॅम बिलिंग्सने 34 धावांची खेळी केली. आंद्रे रसेल आणि शॅम बिलिंग्स यांनी  44 चेंडूत 63 धावांची भागिदारी केली. कोलकात्याकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. कोलकात्याकडून दुसरी सर्वात मोठी भागिदारी अजिंक्य रहाणे आणि अजिंक्य रहाणे यांनी केली आहे. सॅम बिलिंग्स बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. रसेलने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. रसेलने सुंदरच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारत कोलकात्याची धावसंख्या 170 च्या पार नेली. आंद्रे रसेलने 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीत रसेलने चार षटकार आणि तीन चौकार लगावलेत. 


हैदराबादचा भेदक मारा -
कोलकात्याकडून उमरान मलिक याने भेदक मारा केला. सुरुवातीलाच कोलकात्याला तीन धक्के दिले. उमरान मलिकने चार षटकात 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, मार्को जेनसन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


कोलकाताची प्लेईंग 11 -
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चर्कवर्ती 


हैदराबादची प्लेईंग 11 -
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, नटराजन