KKR vs SRH, IPL 2022 : कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय अनिवार्य आहे. कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरचा हा आयपीएलमधील 100 वा सामना आहे. या सामन्यात अय्यरने नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम केलाय. 


कोलकाता संघात दोन बदल -
कोलकाता संघाने निर्णायक सामन्यातही बदल केले आहेत. कोलकाता संघाने दोन बदल केले आहेत. कोलकाता संघात उमेश यादव आणि सॅम बिलिंग्स यांचे पुनरागमन झालेय. तर पॅट कमिन्स आणि शेल्डॉन जॅक्सन यांना आराम देण्यात आलाय. पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित सामन्याला मुकणार आहे. मागील सामन्यात कोलकाताने पाच बदल केले होते.  


हैदराबादच्या संघात तीन बदल -
सनरायजर्स हैदराबाद संघाने निर्णायक सामन्यात तीन बदल केले आहे. मार्को जानसेन, वॉशिंगटन सुंदर आणि नटरजान यांना संधी देण्यात आली आहे. 




कोलकाताची प्लेईंग 11 -
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चर्कवर्ती 


हैदराबादची प्लेईंग 11 -
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, नटराजन 


100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज -
आयपीएलच्या कारकिर्दितील 100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर फक्त दोनच संघाकडून खेळला आहे. दिल्लीच्या संघाकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तर, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकात्याच्या संघानं त्याला विकत घेतलं. श्रेयसची आतापर्यंतची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. मात्र, यादरम्यान त्याला अनेक चढ-उतार पाहावा लागले.


कोलकात्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असेल?



- कोलकात्याचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या रनरेटनं विजय मिळवणं गरजेचं आहे. 


- आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.




- दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे. 



- पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे