Umran Malik, IPL 2022 : जम्मू काश्मिरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने शुक्रवारी झालेल्या सामन्यात वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली. उमरान मलिक याने या सामन्यात तब्बल 150 kmph च्या वेगानं चेंडू फेकला. उमरान मलिक याने फेकलेल्या 148.8 kmph च्या गतीपुढे श्रेयस अय्यर क्लीनबोल्ड झाला. अय्यरला उमरानचा चेंडू समजलाच नाही. उमरानची गोलंदाजी पाहून डेल स्टेनही अवाक झाला होता. त्याची रियॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


उमरान मलिक गोलंदाजीच्या वेगामुळे चर्चेत आला. उमरान मलिक याने कोलकात्याविरोधात ब्रेबॉन स्टेडिअमवर सुरु असलेल्या सामन्यात वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली. उमरानचा एक चेंडू कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही समजला नाही. उमरानची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. उमरानने फेकलेल्या वेगवान चेंडूनंतर हैदराबादचा गोलंदाजी कोच डेल स्टेनही अवाक झाला. सोशल मीडियावर उमरानच्या वेगाची चर्चा सुरु झाली. 


2021 मध्ये हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला कोरोनाची लागण झाल्यानंतर उमरान मलिकला संघात स्थान मिळाले होते. तेव्हापासून उमरान मलिक याने आपल्या वेगानं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगमाआधी रिटेन केले होते. मलिक याने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. 


सोशल मीडियावर मिम्स व्हायरल....






















कोलकाताविरोधा ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात उमरान मलिक याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. उमरान मलिक याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. उमरान मलिकने कर्णधार श्रेयस अय्यर आणि शेल्डॉन जॅक्सन यांना तंबूचा रास्ता दाखवला.