Indian Premier League 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला सामना जिंकून दिलाय. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत.
नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात टीम साऊथीनं देवदत्त पडिक्कलच्या रुपात राजस्थानच्या संघाला पहिला झटका दिला. दरम्यान, तुफान फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर आजच्या सामन्यातही मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूत शिवम मावीनं त्याला बाद केलं. जोस बटलरनं 25 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसननं एक बाजूनं संयमी खेळी दाखवत संघाचा डाव सावरला. त्यानं 49 चेंडूत 54 धावा केल्या. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजी काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. कोलकात्याकडून टीम साऊथीनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, उमेश यादव, अनुकूल रॉय आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
राजस्थानच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. कोलकात्याचा सलामीवीर आरोन फिंच स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर इंद्रजीत बाबनंही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरनं 32 चेंडूत 34 धावा करून माघारी परतला. दरम्यान, नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी दाखवत संघाला विजय मिळवून दिला. नितीश राणानं 37 चेंडूत 48 धावा केल्या. तर, रिंकू सिंहनं 23 धावांत 42 धावांची तुफानी खेळी केली. राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-