KKR vs DC, Result :  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या आजच्या सामन्यात दिल्लीने आधी तुफान फटकेबाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर टेबल टॉपर कोलकाता नाईट रायडर्सला 44 धावांनी मात दिली आहे. दिल्लीकडून वॉर्नर-पृथ्वीने अर्धशतक झळकावलं, तर कुलदीप यादवने 4, खलील अहमदने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरची 51 धावांची अर्धशतकी एकाकी झुंज मात्र व्यर्थ ठरली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 216 धावांचे तगडे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले तर केकेआरला 20 षटकात 171 धावांवर रोखले.



आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली. पण दिल्लीच्या फलंदाजांनी केकेआरचा हा निर्णय़ चूकीचा ठरवत एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. दिल्लीकडून पृथ्वीने 29 चेंडूत 51 धावांची, तर व़ॉर्नरने 45 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. पंतने 27 धावा, तर अखेरच्या काही षटकात अक्षर पटेल (22) आणि शार्दूल ठाकूरने (29) तुफान फटकेबाजी करत संघाचा स्कोर 200 पार पोहोवला. आता केकेआरला विजयासाठी 20 षटकात 216 धावांची गरज होती. केकेआरकडून नारायणने दोन तर वरुण, रसेल आणि उमेशने प्रत्येकी एक विकेट घेतली. 


ज्यानंतर केकेआरचे गडी सुरुवातीपासून तंबूत परत होते. वेंकटेश आणि रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयसने डाव सांभाळला पण राणा 30 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अखेरपर्यंत श्रेयसला खास साथ मिळाली नाही. तोही 51 धावा करुन तंबूत परतला. रसेलने 24 आणि सॅमने 15 धावांची खेळी केली, ज्यानंतरच्या इतरांना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने संघाचा डाव 8 विकेट्सवर 171 धावांवर आटोपला. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4, खलील अहमदने 3, शार्दूलने 2 तर ललिलतने एक विकेट घेतली.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha