Kevin Pietersen and Sunil Gavaskar on Hardik Pandya Captaincy : यंदाच्या IPL हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी अतिशय खराब असल्याचं दिसतेय. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडेवर चेन्नईनं मुंबईचा (MI vs CSK) 20 धावांनी पराभव केला. मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इरफान पठान, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि केवीन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नेतृत्व अतिशय खराब असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं. सुनील गावस्कारांनी हार्दिक पांड्याची गोलंदाजी आणि नेतृत्व अतिशय सामान्य असल्याची टीका केली. तर दुसरीकडे पीटरसन यानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वगुणावरच प्रश्न उपस्थित केले. हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर हूटिंगचा परिणाम होत असल्याचं पीटरसनने सांगितलं.
केवीन पीटरसन काय म्हणाला ?
इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन यानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. पीटरसन म्हणाला की, प्लॅन ए फेल ठरल्यास तुम्ही प्लॅन बी चा वापर का केला नाही. हार्दिक पांड्यानं आपल्या फिरकी गोलंदाजांचा वापर का केला नाही, हे न समजण्यासारखं आहे. टीम मिटिंगमध्ये प्लॅन ए ठरला असेल. पण हा प्लॅन यशस्वी ठरला नाही, तर प्लॅन बी का वापरला नाही...
हार्दिक पांड्यावर हूटिंगचा परिणाम -
केवीन पीटरसनच्या मते हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर हूटिंगचा परिणाम होत आहे. मैदानाबाहेरुन चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा हार्दिक पांड्यावर परिणाम होत आहे. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या हसून सगळं काही ठीक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात असं काही नाही. या परिस्थितीमधून मी गेलो आहे. स्टेडियममधून गेले जाणारं हूटिंग तुमच्यावर मानसिक परिणाम करतेच.
पांड्याच्या नेतृत्वावर सुनील गावस्कर भडकले -
हार्दिक पांड्यानं आतापर्यंत प्रभावी नेतृत्व केले नाही. त्यानं अनेक चूका केल्या आहेत. सुनील गावस्कर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण राहिली, त्याशिवाय त्याचं नेतृत्वही साधारणच राहिलं. शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड चांगली फलंदाजी करत होते, त्यांना रोखायला हवं होतं. चेन्नईला 180-190 पर्यंत रोखायला हवं होतं. हार्दिक पांड्याकडून आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी करण्यात आली.
आणखी वाचा :
हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमुळेच मुंबईचा पराभव, माजी खेळाडूनं खडे बोल सुनावले